Siddaramaiah Sarkarnama
देश

Siddaramaiah News: कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या सिद्धरामय्यांना पहिलं गिफ्ट: दिल्लीत मिळाली मोठी जबाबदारी

Karnataka Congress News: कर्नाटकच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. काँग्रेसच्या हायकमांडच्या आदेशानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या सिध्दरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठीचा डी.के.शिवकुमार यांचा मार्ग अखेर मोकळा झाला.

Deepak Kulkarni

Karantaka News: कर्नाटकच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. काँग्रेस हायकमांडच्या आदेशानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या सिध्दरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठीचा डी.के.शिवकुमार यांचा मार्ग मोकळा झाला. आता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर काहीच दिवसांत सिद्धरामय्या यांच्यावर काँग्रेसनं दिल्लीत मोठी जबाबदारी सोपवली आहे.

काँग्रेस वर्किंग कमिटीत सिद्धरामय्या यांची वर्णी लागली आहे. सीडब्ल्यूसी ही काँग्रेस पक्षाची सर्वोच्च निर्णय घेणारी कार्यकारी संस्था आहे. या निर्णयाची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

सिद्धरामय्या यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्रिपद सोडावे, यासाठी मागील काही महिन्यांपासून काँग्रेस नेत्यांकडून मनधरणी सुरू होती. अखेर ते राजीनामा द्यायला तयार झाले. पण त्यासाठी त्यांना पक्षश्रेष्ठींनी राज्यसभेसह इतरही अनेक मोठ्या ऑफर दिल्याचीही चर्चा होती.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या एका दिवसात सिद्धरामय्या दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. राजधानीत त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती. या बैठकीत त्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर अनेक महत्त्वाच्या मागण्या ठेवल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली होती.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यसभा तसेच विधान परिषदेच्या नियुक्त्यांसाठी काही पसंतीच्या नेत्यांची नावे पक्षनेतृत्वाकडे दिली आहेत. याशिवाय नव्या मंत्रिमंडळातील खातेवाटपाबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे. आपल्या गटातील विश्वासू नेत्यांना सरकारमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाव्यात, यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केल्याची चर्चा होती.

महत्त्वाची बाब म्हणजे सिद्धरामय्या यांनी आपला मुलगा यतींद्र सिद्धरामय्या यांच्यासाठी नव्या सरकारमध्ये मोठ्या मंत्रालयांची मागणी केल्याचंही सांगितलं जात आहे. त्यांनी मुलासाठी वैद्यकीय शिक्षण, उद्योग, जलसंपदा आणि मागासवर्गीय कल्याण यांसारखी महत्त्वाची खाती देण्यात यावी, अशी त्यांची इच्छा व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे दिल्लीतील बैठकीत या मुद्द्यावर मोठी राजकीय चर्चा झाल्याचं मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT