Shivrajyabhishek Din: शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी: राज्याभिषेक सोहळ्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Raigad News: दरवर्षीप्रमाणे यंदाही किल्ले रायगडावर राज्याभिषेक दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यासह देशभरातील लाखो शिवप्रेमी रायगडावर हजेरी लावत असतात.
Shivrajyabhishek Sohala
Shivrajyabhishek SohalaSarkarnama
Published on
Updated on

Raigad News : दरवर्षीप्रमाणे यंदाही किल्ले रायगडावर राज्याभिषेक दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यासह देशभरातील लाखो शिवप्रेमी रायगडावर हजेरी लावत असतात. याच सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आता रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण आणि शिवप्रेमींसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे.

राज्यभिषेक सोहळा समितीकडून सोमवारी(ता.1 जून) बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज्यभिषेक सोहळ्याची संपूर्ण रुपरेषा स्पष्ट करण्यात आली होती. यानंतर आता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अत्यंत महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मंगळवारी (ता.2 जून) जारी केलेल्या नव्या अधिसूचनेत राज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमाला येत असलेल्या शिवप्रेमींना दरवर्षी मनस्ताप सहन करत सामोरे जावे लागत असलेल्या वाहतुककोंडीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. शिवप्रेमींसाठी जिल्हा प्रशासनानं आता विशेष वाहतूक व्यवस्था केली आहे.

जिल्हा प्रशासनानं किल्ले रायगडावर तारीख 5 व 6 जून रोजी होत असलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नवे आदेश काढले आहेत. शिवप्रेमीं राज्याभिषेक दिना निमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी महत्वाचं साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सवलत देण्यात आली आहे.

Shivrajyabhishek Sohala
Maharashtra Farmer Protest: मोठी बातमी: कर्जमाफीची लढाई जिंकल्यानंतरही बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी पुन्हा आंदोलन उभारणार, काय आहे कारण?

जिल्हा प्रशासनाचा हा बंदीचा आदेश 5 जून 2026 रोजी सायंकाळी 4 ते 6 जून 2026 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत लागू असणार आहे. बंदीच्या कालावधीत जड वाहनांच्या वाहतुकीला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वाकण फाटा–नागोठणे ते कशेडी घाट, माणगाव–निजामपूर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगाव–ढालघर फाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला आणि महाड–नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गांवर बंदी राहणार आहे. ही बंदी तात्पुरती असणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे जीवनावश्यक साहित्य,सरकारी यंत्रणांची वाहने आणि अन्य व्यवस्थापनाशी संबंधित वाहने मोठ्या प्रमाणात या मार्गांवरून प्रवास करणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर जड वाहनांच्या वाहतुकीस या मार्गांवर बंदी घालण्यात आली आहे.

Shivrajyabhishek Sohala
Supriya Sule: 'ते' पत्र मला नको शहा-फडणवीसांना पाठवा! सुप्रिया सुळेंचा पोलीस आयुक्तांना टोला; 'नरेटिव्ह'चाही घेतला समाचार

तसेच सर्वसामान्यांशी निगडित दूध,पेट्रोल,डिझेल,स्वयंपाकाचा गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहनं, राज्य, केंद्र सरकारी अधिकारी-कर्मचारी, पोलिस प्रशासन, अग्निशमन दल, रुग्णवाहिका या वाहनांना बंदीतून वगळण्यात आले आहे.

या अधिसूचनेची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी निर्देश दिले आहेत. संबंधित जड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com