Karnataka VidhanSabha Election Result 2023 siddaramaiah , dk shivakumar
Karnataka VidhanSabha Election Result 2023 siddaramaiah , dk shivakumar Sarkarnama
देश

Karnataka Election Result 2023 : कोण होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री ? डी. के. शिवकुमार की सिद्धरामय्या..

सरकारनामा ब्युरो

Karnataka VidhanSabha Election Result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालांची चर्चा देशभरात सुरू आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत आहे. कॉंग्रेसच्या कार्यालयात उत्साहाचे वातावरण आहे.कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरवात केली आहे. काँग्रेसने या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ केला आहे. (siddaramaiah or dk shivakumar who will become chief minister of karnataka)

आता कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार हे दोघेही आहेत. या दोघांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलवले आहे.

सिद्धरामय्या आणि डी.के.शिवकुमार यांच्यातील विळ्या-भोपळ्याचं नातं जगजाहीर आहे. अनेक मुद्यांवरुन दोन्ही नेत्यांमध्ये यापूर्वी वाद झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी काँग्रेसने सावध भूमिका घेत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता.

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची काँग्रेसची परंपरा आहे, पण पहिल्यांदाच काँग्रेसने कर्नाटकात ही परंपरा मोडली. दोन्ही नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदावरुन निवडणुकीपूर्वीच संघर्ष टाळण्यासाठी काँग्रेसने ही भूमिका घेतली होती. "काँग्रेसची सत्ता आली तर नेते ठरवतील की मुख्यमंत्री कोण होणार,' असे मलिक्कार्जून खर्गे यांनी सांगितले होते.

सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, कर्नाटकच्या हितासाठी माझे वडील मुख्यमंत्री झाले पाहिजेत. यावरुन आता काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच असल्याचे दिसत आहे.भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही काहीही करु असे यतिंद्र सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. माझ्या वडिलांनी राज्याच्या हितासाठी मुख्यमंत्री व्हावे, असे यतिंद्र सिद्धरामय्या म्हणाले.

कोण आहेत सिद्धरामय्या

डी.के. शिवकुमार यांच्यापेक्षा सिद्धरामय्या हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. माजी मुख्यमंत्री असलेले सिद्धरामय्या यांना सरकार चालविण्याचा अनुभव असललेले नेते आहेत. 2013ते 2018 पर्यंत ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यात सामाजिक आणि आर्थिक सुधारणा केल्या आहेत.

याबाबत त्याचे सर्वपातळीवर कौतुक झाले होते. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आले तर मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांना जनतेनं पसंती दिल्याचे एक्झिट पोलमध्ये स्पष्ट झाले आहे. २०१८ची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली होती. येत्या लोकसभा निवडणुकीत मोदींना शह देण्यासाठी सिद्धरामय्या यांचे मोठे योगदान असेल, असे राहुल गांधी यांनी नुकतेच म्हटलं आहे.

कोण आहेत डी.के. शिवकुमार

सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून डीके शिवकुमार यांची ओळख आहे. निकाल लागण्यापूर्वी त्यांनी टि्वट करीत मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेसप्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा आढावा असलेला व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमांवर शेअर केला आहे.

कनकपुरा विधानसभा मतदार संघातून विधानसभेवर सलग आठ वेळा निवडून येण्याचा विक्रम डीके शिवकुमार यांनी केला आहे. मुख्यमंत्री होण्याचे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे स्वप्न आहे. गेल्या निवडणुकीत (२०१८) मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव आघाडीवर होते. प्रामाणिक नेते म्हणून डीके शिवकुमार यांची ओळख आहे. डीके शिवकुमार देशातील राजकीय नेत्यांमध्ये सगळ्यात श्रीमंत राजकीय नेते आहेत. कर्नाटकाशिवाय अन्य राज्यातील निवडणूका, लोकसभा निवडणूक लढण्यासाठी शिवकुमार यांची मोठी मदत होई शकते, असे पक्षश्रेष्ठींचे मत आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT