Karnataka Election Result 2023 : बेळगाव दक्षिणमध्ये कमळ फुललं ; अभय पाटील विजयी ; एकीकरण समितीचे कोंडूसकर पराभूत

Karnataka Election Result Live Updates : अभय पाटील हे चौथ्यांदा विजयी झाले आहेत.
Karnataka Election Result Live Updates abhay patil
Karnataka Election Result Live Updates abhay patilSarkarnama
Published on
Updated on

Karnataka Election Result Live Updates : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष बहुमताच्या आकड्याजवळ पोहोचला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मतदारसंघांतही काँग्रेसचाच बोलबोला दिसत आहे. काँग्रेस येथे 14 जागांवर आघाडीवर आहे.

दक्षिण बेळगावचा निकाल जाहीर झाला असून येथे भाजपचे अभय पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडूसकर यांचा पराभूत केला आहे.

या विजयामुळे बेळगाव दक्षिणमध्ये कमळ फुललं आहे. भारतीय जनता पक्षातून तीनवेळा आमदार झालेल्या आमदार अभय पाटील हे चौथ्यांदा विजयी झाले आहेत.

सीमाभागातील एकूण सहा मतदारसंघांवर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. या मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रचार केला होता. त्यासोबतच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या भागामध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या.

आतापर्यंतच्या कलांमध्ये सीमाभागात समितीचा एकही उमेदवार आघाडीवर आलेला नाही. याशिवाय निपाणी मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील सध्या आघाडीवर आहेत.

Karnataka Election Result Live Updates abhay patil
Chittapur Karnataka Election 2023 : चित्तपुरमध्ये काँग्रेसचे प्रियांक खर्गे हॅट्रिक साधणार का ? BJP सोबत काँटे की टक्कर..

बेळगाव जिल्ह्यातील 18 पैकी 14 मतदारसंघावर काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहे. तर, तर, भाजप 3 जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीची पूर्णपणे निराशा झाली आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये सीमाभागात समितीचा एकही उमेदवार आघाडीवर आलेला नाही. याशिवाय निपाणी मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील सध्या आघाडीवर आहेत.

Karnataka Election Result Live Updates abhay patil
Karnataka Election Result 2023 : राष्ट्रवादी खातं खोलणार ? उत्तम पाटील आघाडीवर ; एकीकरण समिती पिछाडीवर..

बेळगाव आणि आसपासच्या एकूण 6 मतदारसंघांतील लढतीकडे प्रामुख्याने लक्ष आहे. यामध्ये बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, निपाणी, यमकनर्डी, खानापूर या मतदारसंघांचा समावेश आहे.

कोण आहेत अभय पाटील ?

2004 साली अभय पाटील तत्कालीन बागेवाडी विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. 2008 साली विधानसभा मतदारसंघ पुनर्रचना झाली, त्यात बागेवाडी मतदारसंघ रद्द झाला. बेळगाव दक्षिण हा नवा विधानसभा मतदारसंघ तयार झाला. अभय पाटील यांनी बेळगाव दक्षिणमधून 2008 ची विधानसभा निवडणूक लढविली व जिंकलीही. 2008 ते 2013 या काळात ते आमदार होते, विविध कारणांमुळे ते पाच वर्षे सातत्याने चर्चेत राहिले. 2013 साली महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार संभाजी पाटील यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. पण 2018 ला पुन्हा बेळगाव दक्षिण मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली व जिंकलीही. तिन्हीवेळा त्यांनी भारतीय जनता पक्षाकडूनच निवडणूक लढविली, त्यामाध्यमातून पक्षनिष्ठा दाखवून दिली.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com