Sidharamaiah 
देश

Sidharamaiah: मुख्यमंत्रीपदं घेणार पण त्याबदल्यात देणार मोठं गिफ्ट! काँग्रेसनं दिल्या 'या' ऑफर्स

Sidharamaiah: कर्नाटकात सध्या मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला असून उद्या गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत, यासाठी त्यांनी राज्यपालांची भेटही मागितली आहे.

Amit Ujagare

Sidharamaiah Politics : कर्नाटकात सध्या मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला असून उद्या गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत, यासाठी त्यांनी राज्यपालांची भेटही मागितली आहे. पक्षाच्या हायकमांडंकडून आदेश आल्यानं सिद्धरामय्या हे आपलं पद सोडणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे, यानंतर त्यांच्या जागी डी. के. शिवकुमार हे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचंही ठरलं आहे. पण मुख्यमंत्रीपदी सोडण्यासाठी काँग्रेसनं सिद्धरामय्यांना मोठी ऑफर दिली असून त्यांना थेट दिल्लीच्या राजकारणात जागा दिली जाणार आहे.

केंद्रीय राजकारणात

सिद्धरामय्या हे काँग्रेसचे मोठे नेते असून त्यांनी कर्नाटकात कायम काँग्रेसला मजबूत करण्याचं काम केलं आहे. तितल्या जनमानसात त्यांचा चांगला राबता असून पक्षांतर्गत हायकमांड आणि इतर बड्या नेत्यांशी देखील त्यांचा सातत्यानं संपर्क असतो त्यामुळं सत्ता राबवताना आणि महत्वाचे धाडसी निर्णय घेताना त्यांना कुठलीही अडचण आलेली नाही. त्यामुळं सिद्धरामय्या यांची गरज ओळखून त्यांना आता केंद्राच्या राजकारणात सक्रीय करण्याचा काँग्रेसचा मानस आहे. त्यामुळं कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर सिद्दरामय्या यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन खासदारकी देण्याचा विचार काँग्रेस हायकमांडकडून निश्चित झाला आहे.

काँग्रेसची नेमकी ऑफर काय?

सुत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस नेतृत्वां सिद्धरामय्या यांना स्पष्टरित्या सांगितलं आहे की, दिल्लीत आता त्यांच्यासारख्या प्रमुख ओबीसी नेत्याची गरज आहे. विशेषतः अशा काळात जेव्हा राहुल गांधी यांनी देशभरात काँग्रेसच्या सामाजिक न्याय आणि जाती आधारित जनगणनेच्या मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे.

सिद्धरामय्या हे मोठे ओबीसी नेते असल्यानं काँग्रेसची इच्छा आहे की, २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्तरावर ते मोठी भूमिका बाजवू शकतात. काँग्रेसच्या हायकमांडंनं सिद्धरामय्या यांना आश्वासन दिलं आहे की, जर ते राज्यसभेच्या मार्गानं दिल्लीच्या राजकारणात सक्रीय झाले तर त्यांच्या इतर मागण्या आणि मुद्द्यांचाही विचार केला जाईल.

याचाच अर्थ काँग्रेस सिद्धरामय्या यांना राज्यसभेच्या मार्गानं राष्ट्रीय राजकारणात आणून २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत एक मोठी संघटनात्मक भूमिका सोपवण्यासाठी इच्छुक आहे. राज्यसभेच्या मार्फत राजकीय स्वरुपात एक एक्झिट फॉर्म्युला मानला जातो. पण यातून सिद्धरामय्या यांची प्रासंगिकता कमी झाली किंवा त्यांना कर्नाटकच्या राजकारणातून बाहेर ढकलण्यात आलं असं वाटू नये याचीही काळजी काँग्रेसकडून घेतली जात असल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सिद्धरामय्या यांच्या मुलाला कर्नाटकात उपमुख्यमंत्री पदाची ऑफर काँग्रेसकडून देण्यात आली आहे. याशिवाय सिद्धरामय्या यांच्या मर्जीतल्या मंत्र्यांना महत्वाची खातीही देण्यात येणार आहेत. पण अशा प्रकारची आश्वासनं सिद्धरामय्यांना दिल्याचं काँग्रेसनं अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही, उलट असं काहीही नसल्याचंच म्हटलं आहे.

पण या सर्व घडामोडींचं टायमिंग महत्वाचं मानलं जात आहे. कारण राज्यसभेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ८ जून आहे. तत्पूर्वीच कर्नाटकातील राजकीय व्यवस्था मार्गी लावून सिद्धरामय्या यांना उमेदवारी अर्ज भरायला सांगून त्यांचं दिल्लीतील स्थान निश्चित करण्यासाठीच काँग्रेसनं वेगानं याबाबत निर्णय घेतल्याचंही बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT