Siddaramaiah  Sarkarnama
देश

CM Siddaramaiah : सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपद सोडणार? ; कर्नाटकातील राजकीय गोटात चर्चांना उधाण!

Mayur Ratnaparkhe

Karnataka Congress Politics News : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पक्षांतर्गत सुरू असलेल्या संघर्षावरच्या पार्श्वभूमीवर आणि नेतृत्व परिवर्तनाच्या चर्चांवर उत्तर दिलं आहे. मागील काही दिवसांपासून सिद्धरामय्या मुख्यमंत्री पद सोडू शकतात, या चर्चांनी जोर धरला आहे. अशावेळी त्यांचं हे विधान महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. तूर्त तरी पक्षाच्या हायकमांडवर हा निर्णय सोडलेला आहे.

सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे की, 'पक्ष हायकमांडचा जो काही निर्णय असेल, त्याचं मी पालन करेन.' यादरम्यान असं मानलं जात आहे की जर सिद्धरामय्यांनी मुख्यमंत्री पद सोडलं तर डी.के. शिवकुमार यांनाच मुख्यमंत्री बनवलं जाऊ शकतं.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah ) यांनी सोमवारी म्हटलं की, राज्यात जर नेतृत्व बदलाबाबत हायकमांडकडून काही निर्णय घेतला गेला, तर ते त्याचं पालन करतील. त्यांचं हे विधान पक्षांतर्गत सुरू असलेल्या ओढताणीच्या पार्श्वभूमीवर आलं आहे.

वोक्कालिगा समुदायाचे एका प्रतिष्ठित महंतांनी मागील आठवड्यातच जाहीरपणे सिद्धरामय्यांनी पद सोडवं असा आग्रह केला होता. जेणकरून उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासाठी मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा होवू शकेल.

विश्व वोक्कालिगारा महासंस्थान मठाचे महंत चंद्रशेखरनाथ स्वामीजींच्या आवाहनाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, हा सार्वजनिक चर्चेचा विषय नाही. हायकमांड जो काही निर्णय घेईल, आम्ही त्याचं पालन करू. याशिवाय मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी म्हटलं की, मी स्वामींच्या विधानावर टिप्पणी करू इच्छित नाही. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत, एक हायकमांड आहे.'

याचदरम्यान डी.के.शिवकुमार(D.K. Shivakumar) यांनी नेत्यांना तंबी दिली की, तुम्ही नेतृत्व बदल आणि उपमुख्यमंत्री पद निर्माण करण्यासंबंधी कोणतही विधान करू नका. जर कोणी मर्यादेचं उल्लंघन करत असेल, तर पक्ष कारवाई करेल.

याचबरोबर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या काही मंत्र्यांनी लिंगायत, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक समुदायातूनही उपमुख्यमंत्री बनवला जावा अशी मागणी केली आहे.

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या शिवकुमार यांचा राजकीय प्रभाव कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे काही जण मानत आहेत. शिवकुमार हे वोक्कालिगा समाजातून येतात आणि सध्या सिद्धरामय्यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT