Nagar Political : नरेंद्र मोदींच्या हातात देश आणि जनता असुरक्षित : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Freedom Fighter, Sahakar Maharshi Bhausaheb Thorat Jayanti Mahotsav Committee at Sangamner : संगमनेर येथे स्वातंत्र्यसैनिक, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सव समितीच्यावतीने पुरस्कार वितरण सोहळा
CM Siddaramaiah
CM SiddaramaiahSarkarnama

Nagar Political : "भाजप सरकारच्या हुकुमशाहीमुळे देशाची अधोगतीकडे चालला आहे. ब्रिटिशांच्या तावडीतून देशाला वाचविण्यात काँग्रेसचा सहभाग राहिला आहे. बाकी कुणाचा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या माणसाला देशात सत्ता दिल्यास देशाची सुरक्षा धोक्यात येईल. तसेच संविधानालाही धक्का बसेल", असे प्रतिपादन कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.

संगमनेर येथील जाणता राजा मैदान येथे स्वातंत्र्यसैनिक, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सव समितीच्यावतीने पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात बोलत होते. तसेच 2024 हे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची जन्मशताब्दी वर्ष असून यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचबरोबर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले.

CM Siddaramaiah
Dharashiv News : धाराशिवमध्ये स्वाभिमानी आक्रमक ; राजू शेट्टी काढणार ट्रॅक्टर मोर्चा...

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavhan) हे अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील, माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे नेते माजी मंत्री भास्करराव जाधव, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम उपस्थित होते.

यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, आमदार झिशन सिद्दकी ,आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, सौ. कांचन थोरात, सौ. दुर्गा तांबे, बाजीराव पा. खेमनर, रणजीत सिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, आमदार शिरीष चौधरी, आमदार राजेश राठोड, माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार नामदेवराव पवार, आमदार हिरामण खोसकर, आमदार लहू कानडे उपस्थित होते.

सिद्धरामय्या (Siddaramaiah) म्हणाले, "भाऊसाहेब थोरात यांनी सहकार चळवळीतून ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण केली. तर डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी हरितक्रांतीमध्ये योगदान दिले. भारतात अन्नधान्याच्या बाबत स्वयंपूर्ण आहे. तो फक्त काँग्रेसमुळेच. सहकार चळवळ ही ग्रामीण भागाला सशक्त बनवते. मात्र केंद्र सरकार सहकार चळवळ मोडीत काढून पाहत आहे. राज्याचे सर्व अधिकार त्यांनी ताब्यात घेतले आहेत".

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारतीय जनता पक्ष ही भ्रष्ट पक्ष असून कर्नाटकमध्ये 40% कमिशन घेत होते. त्यामुळे जनतेने त्यांचा मोठा पराभव केला. राज्यात पाच कलमी विकास योजना निवडणुकीपूर्वी जाहीर करावी. संपूर्ण देशात काँग्रेसमय वातावरण असून भाजपची हुकूमशाही रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काँग्रेस पक्ष लढली असून आत्ताचे सत्ताधारी त्यावेळेस कुठेही नव्हते.

मागील सत्तर वर्षातील प्रगती ही काँग्रेसमुळे झाली असून लोकशाही व संविधान धोक्यात आहे. भाजप वसाहतवाद योजना आणत आहे. ही देशाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे', असेही सिद्धरामय्या यांनी म्हटले.

देशांमध्ये दोघांची हुकुमशाही : जाधव

माजी मंत्री भास्करराव जाधव यांनी संगमनेरच्या सहकार, शिक्षण, नम्रता ही राज्यासाठी दिशादर्शक आहे.

भाऊसाहेब थोरात यांच्या संस्कारातून बाळासाहेब थोरात काम करत असून प्रगतशील तालुका ही ओळख राज्यात नव्हे. तर देशासाठी मार्गदर्शक आहे. स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे या दोन विभूतींनी हा परिसर सुजलाम-सुफलाम केला. थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर हे सहकाराची पंढरी ठरली आहे. सध्या एकनिष्ठता राहिली नसून सत्तेसाठी लोक पक्ष बदलत आहेत.

देशांमध्ये दोघेजण हुकुमशाहीतून देश हातात घेत आहेत. खोटा इतिहास सांगत आहेत. 2014 ला स्वातंत्र्य मिळाले, असे म्हणतात. मग 1947 ला स्वातंत्र्य मिळाले ते काय होते. ब्रिटिशांविरुद्ध लढताना त्यावेळी अनेकांनी प्राण्यांची आहुती दिली. तुरुंगवास भोगला. त्यांची तुम्ही थट्टा करत आहात, असा टोलाही भास्करराव जाधव यांनी भाजपला लगावला.

गांधीवादी विचार जपला : आव्हाड

माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रामकृष्ण हरी म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली. आपण कायम गांधीवादी विचार जपला असून जिवंत आहे, तोपर्यंत हा विचार आपण सोडणार नाही. असे सांगताना देशाचा कोणताही पंतप्रधान दुसऱ्या देशात जातो तेव्हा महात्मा गांधी यांचेच नाव सांगतो.

संगमनेरमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगले काम सहकाराच्या माध्यमातून झाले असून येथे निष्ठा जपली आहे. मी ही कायम निष्ठा जपली असून बापाला घरी बसा असे सांगणारे काही लोक आहेत. शरद पवार हे कायम पुरोगामी विचारांची ताकद राहिली असून मरण आहे तोपर्यंत मी या विचारांची बांधील असल्याचे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

उल्हास पवार, जैन उद्योग समूह आणि पी. एन. पाटील यांचा सन्मान

साहित्य सहकार समाजकारण व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ गांधीवादी नेते माजी आमदार उल्हास पवार यांना स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कृषी संशोधन व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दलचा हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जैन उद्योग समूह जळगाव यांना देण्यात आला. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्यावतीने एक लाख रुपये रोख सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेच्यावतीने आमदार पी. एन. पाटील यांना गौरविण्यात आले.

(Edited by Amol Sutar)

CM Siddaramaiah
Satara NCP : जे गेलेत त्यांची चिंता करू नका..! बालेकिल्ला टिकवण्याचे शिवधनुष्य कार्यकर्त्यांच्या हातात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com