Balkaur Singh, father of late Punjabi singer Sidhu Moosewala sarkarnama
देश

Sidhu Moosewala father : सिद्धू मूसेवालाच्या वडिलांनी घेतला मोठा निर्णय; पंजाब विधानसभा निवडणूक लढणार!

Balkaur Singh to Enter Punjab Politics :जाणून घ्या, ते कोणत्या मतदारसंघतून आणि पक्षाकडून लढणार आहेत?

Mayur Ratnaparkhe

Sidhu Moosewala’s father Balkaur Singh announces decision to contest Punjab elections : दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाचे वडील बलकौर सिंग यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आता सक्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. यासाठी ते २०२७मध्ये होणारी पंजाब विधानसभा निवडणूक लढवणार असून, मानसा मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी स्वत: जाहीर केले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बलकौर सिंग यांनी ही घोषणा केली. मुलगा सिद्धू मूसेवाला याचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि न्यायासाठी जोरदार लढा देता यावा या उद्देशाने आपण राजकारणात प्रवेश करणार असल्याचे बलकौर सिंग यांनी सांगितले आहे.

बलकौर सिंग यांनी आपल्या निर्णयाबाबत माहिती देताना सांगितले की, होय मी निवडणूक लढवणार आहे. व्यवस्थेत सहभागी होवूनच आपण न्यायाबद्दल बोलू शकतो, असे मला वाटते. शिवाय यावेळी त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, जेव्हा जेव्हा निवडणूक जवळ येते त्या त्यावेळी मुख्यमंत्री खोटे बोलतात. ते केवळ निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने विधानं करत असतात, जे कायम खोटे सिद्ध होतात.

याशिवाय पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी गोल्डी ब्रारच्या अटकेबाबत केलेल्या दाव्यवारही बलकौर सिंग यांनी टिप्पणी केली. ते म्हणाले की, मला त्यावर भाष्य करावे वाटत नाही. कारण त्यांचा खोटारडेपणा प्रत्येकवेळी उघड होतो. ते केवळ निडणूक जवळ आली की ती जिंकण्यासाठी ते काहीही बोलत असतात.

तर बलकौर सिंग यांनी ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत, हे अजूनतरी स्पष्ट केलेले नाही. त्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र बलकौर सिंग यांनी घेतलेला हा निर्णय मूसेवालाच्या समर्थकांसाठी सुखद ठरू शकतो.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT