Karnataka News: कर्नाटकमधील सत्ताधारी भाजपच्या आमदारपुत्राला तब्बल ४० लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. लोकायुक्त पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ही लाच थेट आमदारांच्या कार्यालयातच घेतली जात होती. त्यामुळे ही लाच आमदारासाठीच स्वीकारली जात असल्याचा दावा केला जात आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली.
कर्नाटकमध्ये काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्नाटकमधील चन्नागिरीचे भाजप आमदार के. मडल विरुपक्षप्पा (K Madal Virukshappa) यांचा मुलगा व्ही. प्रशांत मडल (V Prashant Madal) यास अटक केल आहे.
प्रशांत लाच स्वीकारणार असल्याची माहिती मिळताच लोकायुक्त पोलिसांनी थेट विरूपक्षप्पा यांच्या कार्यालयात धाड टाकली. तेथे प्रशांत यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. या कारवाईनंतर प्रशांत यांच्या घरी छापे टाकण्यात आले. तेथून तब्बल ६ कोटींचे घबाड सापडले आहे.
व्ही प्रशांत मडल हे बंगळुरू पाणी पुरवठा विभागात मुख्य अकाऊंटंट म्हणून कार्यरत आहेत. लाच मागितली त्याच व्यक्तीने प्रशांत यांच्याविरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर लोकायुक्त पोलिसांनी क्रेसेंट रोडवरील विरुपक्षप्पा यांच्या कार्यालयावर छापा टाकला. यावेळी प्रशांत ४० लाख रुपयांची लाच स्वीकारताना आढळून आले. दरम्यान, प्रशांत यांनी तक्रारदाराकडे ८१ लाखांची लाच मागितली होती. त्या रकमेतील ४० लाख प्रशांत स्विकारत होते.
भाजप आमदार विरुपक्षप्पा हे कर्नाटक सोप अँड डिटर्जेंट लिमिटेडचे संचालक आहेत. त्यांच्या कार्यालयात घेतली जाणारी लाच ही त्यांच्याच नावाने घेतली जात असल्याचा दावा लोकायुक्त पोलिसांनी केली आहे.
या कारवाईनंतर विरुपक्षप्पा यांच्या कार्यालयाची झडती घेतली. तेथून एक कोटी २० लाख रुपये रोख ताब्यात घेतले. त्यानंतर प्रशांत यांच्या घरीही छापा टाकला. तेथे तब्बल ६ कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम सापडली. या प्रकरणी प्रशांत यांना अटक करून चौकशी सुरू आहे, अशी माहितीही लोकायुक्त पोलिसांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.