New Delhi News: दिल्लीतील जंतर मंतरवर अभूतपूर्व आंदोलन केल्यानंतर तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सीजेपीनं गेल्या काही दिवसांपासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी एल्गार पुकारला आहे.
मात्र, 'सीजेपी'नं जंतर मंतरवर पुकारलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अनेक नेते आणि आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. याच पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते,पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनीही पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
सोनम वांगचुक यांनी दिल्लीत सीजेपीच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. जर अटक केलेल्या आंदोलकांची सुटका करण्यात आली नाही,तर पुन्हा उपोषण किंवा पदयात्रा सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे.वांगचुक यांनी देशात सध्या 'अघोषित आणीबाणी'सारखी परिस्थिती असल्याचा हल्लाबोलही केला आहे.
वांगचुक म्हणाले,पोलिसांनी जर रविवारी (ता.11 ऑक्टोबर) सायंकाळपर्यंत ताब्यात घेतलेल्या सर्व नेत्यांची आणि आंदोलकांची सुटका करण्यासाठी मुदत दिली आहे. या दिलेल्या मुदतीत जर ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सोडलं नाही,तर पुन्हा एकदा शांततेत उपोषण किंवा दिल्ली ते लेह पदयात्रा काढण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
तसेच सोनम वांगचुक यांनी दिल्लीसह देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये शांतता आणि एकता राखण्याचं सर्वांना आवाहन केलं होतं. मात्र, शांततापूर्ण आंदोलकांवर झालेली अटकेची कारवाई अत्यंत निषेधार्ह असल्याचं सांगत सरकारवर निशाणा साधला आहे. यामुळे वांगचुक यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे.
कॉक्रोच जनता पार्टीकडून देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा धारण केल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर मोठं आंदोलन उभारणार होते.
परंतु सीजेपीच्या अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना दिल्लीच्या विमानतळावरुन ताब्यात घेतलं आहे. सोबतच चार माजी मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षांच्या अनेक बड्या नेत्यांनाही पोलिसांनी जंतर-मंतरवर जाण्याआधीच ताब्यात घेतलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.