Rahul Gandhi News: काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय, सर्व आमदार-खासदारांना तातडीनं दिल्लीत हजर राहण्याचे आदेश

Delhi Political News: काँग्रेसच्या हायकमांडने आता सर्व खासदार आणि नेत्यांना तातडीनं सोमवारी (ता.12 ऑक्टोबर) देशाची राजधानी दिल्लीत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामागे काँग्रेस लवकरच मोठा राजकीय धमाका करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.
Rahul Gandhi News
Rahul Gandhi NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

New Delhi News: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि मतदार यादीतील कथित अनियमितेच्यामुद्द्यावरून काँग्रेससह विरोधकांच्या'इंडिया'आघाडीनं गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत तीव्र आंदोलनं छेडली आहेत. याच आंदोलनाला काँग्रेसच्याच अनेक खासदारांनी दांडी मारल्यामुळे हायकमांड प्रचंड संतापल्याची माहिती समोर आली होती. याचदरम्यान, काँग्रेस हायकमांडनं आता एक मोठा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसच्या हायकमांडने आता सर्व खासदार आणि नेत्यांना तातडीनं सोमवारी(ता.12 ऑक्टोबर) देशाची राजधानी दिल्लीत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामागे काँग्रेस लवकरच मोठा राजकीय धमाका करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिल्लीतील तीन दिवसीय आंदोलनादरम्यान झालेल्या इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान महाराष्ट्रासह इतर राज्यांतील अनेक काँग्रेस खासदारांनी दांडी मारली होती. याची गंभीर दखल घेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधींनी दांडी मारलेल्या खासदारांची नावे लिहून घेण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी श्रीवेल्ला प्रसाद यांनी गैरहजर खासदारांना फोन करून अनुपस्थित राहण्यामागचं कारणही विचारल्याचं समोर येत आहे. तसेच काँग्रेसकडून पक्षशिस्तीचा भंग करत आंदोलनात सहभागी न झालेल्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Rahul Gandhi News
CJP Protest: सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट अंगलट..! 'सीजेपी'चं आंदोलन सुरू असताना भाजपच्या माजी आमदाराच्या कन्येला पोलिसांनी पकडलं

काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी तीन दिवसांच्या तीव्र आंदोलन आणि राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेतल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि एसआयआर प्रक्रियेविरोधातील आंदोलनाची पुढील दिशा लवकरच ठरवली जाणार आहे.

राहुल गांधी काँग्रेस पक्ष आणि विरोधकांची इंडिया आघाडी आता केंद्रीय निवडणूक आयोग आणि आयुक्तांच्या विरोधातील सुरू झालेलं हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्व लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या खासदारांसह आमदारांनाही दिल्लीत पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Rahul Gandhi News
CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सुप्रीम कोर्टाचे वकील उतरले रस्त्यावर, मुंबई-पुण्यातही आंदोलक आक्रमक; पोलिसांनी घेतलं ताब्यात

काँग्रेस पक्षात आता महाराष्ट्रातील किती खासदार दिल्लीतील आंदोलनात सहभागी झाले होते,याविषयीची जोरदार चर्चा सुरू आहे. तीन दिवसांच्या आंदोलनात महाराष्ट्रातील केवळ चार ते पाच खासदार पूर्णवेळ उपस्थित होते.

विशेष म्हणजे आंदोलनाच्या पहिल्या दिवशी राज्यातील काही खासदार उपस्थित होते. मात्र, त्यानंतरच्या आंदोलनात महाराष्ट्रातील खासदारांनी दांडी मारली. ही उपस्थिती कमी झाल्याचं पक्षाच्या नेतृत्वाच्या निदर्शनास आल्याच्या सूचना केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com