CJP Protest: सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट अंगलट..! 'सीजेपी'चं आंदोलन सुरू असताना भाजपच्या माजी आमदाराच्या कन्येला पोलिसांनी पकडलं

BJP News: भाजपचे माजी आमदार विक्रम सिंह यांची मुलगी यशस्विनी राजे सिंहने काही दिवसांपूर्वी धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शिक्षणमंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर प्रल्हाद जोशींवरही टीकेची झोड उठवली होती. तसेच कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनालाही पाठिंबा दर्शवला आहे.
Yashswini raje Singh CJP bjp .jpg
Yashswini raje Singh CJP bjp .jpgSarkarnama
Published on: 
Updated on: 

New Delhi News: 'कॉक्रोच जनता पार्टीचं'देशाची राजधानी दिल्लीत जोरदार आंदोलन सुरू आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी अन् एसआयआर प्रक्रियेविरोधात'जंतरमंतर'वर जोरदार आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस हाय अलर्ट मोडवर आहेत. विरोधकांसह सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनादरम्यान उत्तर प्रदेशमधील भाजपचे ज्येष्ठ नेत्याच्या मुलीलाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

भाजपचे माजी आमदार विक्रम सिंह यांची मुलगी यशस्विनी राजे सिंहने काही दिवसांपूर्वी धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शिक्षणमंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर प्रल्हाद जोशींवरही टीकेची झोड उठवली होती. तसेच कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनालाही पाठिंबा दर्शवला आहे.

आता पुन्हा एकदा यशस्विनी राजे सिंह चर्चेचा विषय ठरली आहे. तिने दिल्लीत सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनादरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत खळबळ उडवून दिली आहे. हीच पोस्ट तिच्या अंगलट आली असून पोलिसांनी तिला तात्काळ ताब्यात घेतलं आहे.

दिल्लीत सीजेपीकडून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन पुकारलं असताना उत्तर प्रदेश भाजपचे माजी आमदार विक्रम सिंह यांची कन्या यशस्विनी राजे सिंहला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Yashswini raje Singh CJP bjp .jpg
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा मुक्काम तुरुंगातच; न्यायालयाने जामीन नाकारला

तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. तिने या फोटोसोबत 'बंगला साहिबच्या जवळ एका बागेत बसल्यामुळे ताब्यात घेण्यात आलं. आता केशव पुरम पोलीस ठाण्यात आहोत,' असं एक्स प्लॅट फॉर्मवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

भाजपचे माजी आमदार विक्रम सिंह यांची मुलगी यशस्विनी राजे सिंह या व्यवसायानं कंटेंट क्रिएटर आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवतानाच प्रल्हाद जोशी यांची नवीन शिक्षणमंत्री म्हणून झालेल्या नियुक्तीला 'एक वाईट विनोद' म्हणत आपल्याच पक्षाच्या सरकारला डिवचलं होतं.

Yashswini raje Singh CJP bjp .jpg
MPCB Officers Suspended: उद्योगांना परवानगी देताना पैशांचा खेळ? प्रदूषण नियंत्रण मंडळातील सहा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

यशस्विनी सिंह यांनी स्वतः जंतर मंतर येथे सीजेपीने आयोजित केलेल्या आंदोलनात भाग घेतला होता. तसेच त्यांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनामा पत्रावरुनही टोला लगावला आहे. यशस्विनी यांनी प्रधानांची त्यांच्या "राजीनामा पत्रातील भाषा ही आपल्या कृतीबद्दल पश्चात्ताप किंवा जबाबदारी स्वीकारणाऱ्या व्यक्तीची वाटत नसल्याचं म्हटलं होतं. यावेळी त्यांनी प्रधानांची राजीनामा पत्रातील भाषा ही एका 'शहीद'सारखी असल्याचा शाब्दिक हल्ला त्यांनी चढवला होता.

केंद्रातील मोदी सरकारविरोधात भाजपच्याच एका ज्येष्ठ नेत्याच्या मुलीने सीजेपीला पाठिंबा दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.एकीकडे राजधानी दिल्लीत तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

तसेच पोलिसांनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके,सह संयोजक आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्यासह 500 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.राजधानीनं लष्करी छावणीचं स्वरुप धारण केलं आहे.

एकीकडे सीजेपीनं आंदोलनाचं आवाहन केलं असताना दिल्लीत 40 हजारपेक्षा अधिक पोलीस आणि सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. बॅरिकेड्स आणि स्पाईक्स स्ट्रिप्स सगळीकडे लावण्यात आले आहेत. हे आंदोलन शनिवारी (ता.10) सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात होणार होते. पण त्यापूर्वीच पोलीस आणि निमलष्करी दलानं जंतरमंतरवर पोहोचण्याच्या तयारीत असलेल्या सीजेपीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com