Sonam Wangchuk Sarkarnama
देश

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून डिस्चार्ज! व्हिडिओ संदेशाद्वारे सांगितला पुढचा प्लॅन

Sonam Wangchuk: कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सोनम वांगचूक यांनी सुमारे तीन आठवडे उपोषण केलं होतं. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Amit Ujagare

Sonam Wangchuk: कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सोनम वांगचूक यांनी सुमारे तीन आठवडे उपोषण केलं होतं. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांनी आपलं उपोषण सोडलं होतं. पण आता पूर्ण उपचार झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते गुरुग्राम येथील वेदांता या खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांनी स्वतः आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ संदेश शेअर करत याची माहिती दिली. याच संदेशातून त्यांनी आता त्यांचा पुढचा प्लॅन काय आहे? हे देखील सांगितलं आहे.

रुग्णालयाचं म्हणणं काय?

सोनम वांगचुक यांच्या डिस्चार्जनंतर मेदांता रुग्णालयानं सांगितलं की, सोनम वांगचुक यांना २१ जुलै २०२६ यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं, त्यांना आज सुट्टी देण्यात आली आहे. मेदांता मल्टि-स्पेशालिटी स्टँडर्डच्या अनुसार, त्यांचा उपचार अंतर्गत मेडिसीन, क्रिटिकल केअर आणि संबंधित स्पेशालिटी मिळून बनवलेल्या इंटिग्रेटेड प्रोटोकॉलनुसार, केलं होतं. सुट्टीच्या दिवशी त्यांची प्रकृती स्थिर होती, पण ते पूर्णपणे शुद्धीत होते. त्यांचे वैद्यकीय परिमाणं देखील नॉर्मल होते. त्यांना आता ओपीडीमध्ये रुटीन चेकअपचा सल्ला देण्यात आला आहे.

वांगचुक यांनी सांगितला पुढचा प्लॅन

दरम्यान, वांगचुक यांनी रुग्णालयातून डिस्चार्जनंतर पुढचा प्लॅन काय आहे हे सांगताना म्हटलं की, आज मी इथून बाहेर पडल्यानंतर आणि माझ्या घरी लडाखला जाण्यापूर्वी राजघाटावर जाऊन बापूंना अभिवादन करणार आहे. यापूर्वी मी जेव्हा स्वित्झर्लंडवरुन आलो होतो. त्यानंतर उपोषण सुरु करण्यापूर्वी मी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केलं होतं. तेच आता मी हे उपोषण संपल्यानंतर पुन्हा करणार आहे. त्यानंतर मी माझ्या घरी लडाखला जाणार आहे.

दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी कॉक्रोच जनता पार्टीच्या मागणीनुसार, आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून दिला. यानंतर सोनम वांगचुक यांनी आपलं निवेदन सादर करत सीजेपी आणि जेनझींचं अभिनंद केलं आहे. तसंच त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर म्हटलं की, हा लोकशाहीचा विजय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT