Sonia Gandhi News : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुरुवारी (ता.26) रात्री निधन झाले. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसची कर्नाटकमध्ये सुरू असलेले विशेष अधिवेशन रद्द करत राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे दिल्लीत दाखल झाले.
राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वहिली. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सोनिया गांधी यांनी 2018 मध्ये केलेले वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे.
2004 मध्ये काँग्रेस प्रणित युपीए आघाडीने भाजप प्रणित एनडीए आघाडीचा पराभव केला होता. त्यावेळी पंतप्रधान म्हणून सोनिया गांधी शपथ घेतली, अशी शक्यता होती. मात्र, सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद न स्वीकारता ते मनमोहन सिंग यांना दिले. मनमोहन सिंग 2004 ते 2014 असे सलग दहा वर्ष पंतप्रधान होते.
2018 मध्ये एका कार्यक्रमात बोलताना सोनिया गांधी मुंबईतील एका कार्यक्रमात म्हणाल्या होत्या, 'मला हे स्वीकारताना कोणताही कमीपणा नाही वाटत की 2004 मध्ये पंतप्रधापदी मनमोहन सिंग यांची नियुक्ती केल्यानंतर ते माझ्यापेक्षा चांगले पंतप्रधान असतील.'
सोनिया गांधी म्हणाल्या होत्या, 'मला माझ्या मर्यादा माहीत होत्या, मनमोहन सिंग हे माझ्यापेक्षा चांगले पंतप्रधान ठरतील.'
मनमोहन सिंग यांचे पार्थिव दर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात आले आहे. त्यांची मुलगी अमेरिकेहून परतल्यानंतर शनिवारी (ता.28) त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात येतील. सोनिया गांधींनी आज (शुक्रवारी) मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले त्यावेळी त्या भावूक झाल्याच्या दिसल्या.
मनमोहन सिंग यांचे पार्थिव उद्या (शनिवारी) दर्शनासाठी उद्या सकाळी 8 वाजता ठेवले जाणार आहे. तेथे 9.30 पर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांचे अंतिम दर्शन घेता येणार आहे. काँग्रेस मुख्यालयातून त्यांची अंत्ययात्रा सकाळी 9.30 सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.