Anna Hazare: मनमोहन सिंग सरकारविरोधात दंड थोपटलेले अण्णा हजारे आज काय म्हणाले? 'दोनदा पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक अन्...'

Manmohan Singh Death Anna Hazare reaction : अण्णा हजारे यांनी 2011 मध्ये दिल्लीत भ्रष्टाचाराविरोधात मोठे आंदोलन उभारले होते. त्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान होते.
Manmohan Singh, Anna Hazare
Manmohan Singh, Anna HazareSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरूवारी रात्री निधन झाले. त्यानंतर जगभरातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे. अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही आपल्या भावना व्यक्त करत मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली.

अण्णा हजारे यांनी 2011 मध्ये दिल्लीत भ्रष्टाचाराविरोधात मोठे आंदोलन उभारले होते. त्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान होते. त्यांचे 2014 मध्ये सरकार जाण्यास हे आंदोलनही कारणीभूत ठरले होते. तसेच आम आदमी पक्षाचा उदयही याच आंदोलनातून झाला. आज मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना हजारेंना त्या आंदोलनाची आठवण झाली.

Manmohan Singh, Anna Hazare
Manmohan Singh : "त्यांना BMW पेक्षा मारुती 800 जास्त आवडायची..." मनमोहन सिंग यांचे सुरक्षा रक्षक राहिलेल्या भाजप नेत्याची 'ती' भावनिक पोस्ट व्हायरल

‘पीटीआय’शी बोलताना अण्णा हजारे म्हणाले, आंदोलनादरम्यान दोनदा पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक झाली आणि त्यांनी झटक्यात निर्णय घेतला. समाज आणि देशाप्रती आस्था आणि प्रेम असेल तर एखादी व्यक्ती किती चांगले काम करू शकते, याचे मनमोहन सिंग उदाहरण आहेत. ते शरीराने आपल्यातून गेले असले तरी आठवणींमध्ये नेहमीच जिवंत असतील, अशी भावना हजारेंनी व्यक्त केली आहे.

रोज अनेक लोक जगात येतात आणि जातात. कोण गेले, हे कुणाला कळतही नाही. पण काही लोक असतात, जे आपल्या आठवणी मागे ठेऊन जातात. समाजासाठी ते असे काही करतात की त्यांच्या खुणा जगात नेहमीच जिवंत राहतात. मनमोहन सिंग त्यापैकी एक व्यक्ती होते, अशी भावना अण्णा हजारेंनी व्यक्त केली आहे.

Manmohan Singh, Anna Hazare
Manmohan Singh : डॉ. मनमोहन सिंग यांना भारतरत्न देण्याची आम आदमी पक्षाची मागणी

मनमोहन सिंग यांच्यासाठी समाज आणि देश सर्वात प्रथम होता. ते नेहमी देशाचा विचार करायचे. त्यांच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था बदलली. त्यामध्ये मनमोहन सिंग यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळे देशाला एक नवीन दिशा मिळाली. देश आजही प्रगतीपथावर असल्याचेही हजारे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com