Sonia Gandhi News sarkarnama
देश

Sonia Gandhi News : सोनिया गांधी दिल्ली सोडून जयपूरला पोहोचल्या; प्रदूषण की राजकारण, काय आहे नेमकं कारण?

Congress Leader Sonia Gandhi in Jaipur : राजस्थानमध्ये विधानसभेच्या ऐन निवडणुकीत सोनिया गांधी दिल्लीतून जयपूरमध्ये दाखल झाल्या. यामागे काँग्रेसची मोठी खेळी असल्याची चर्चा रंगली आहे...

Sachin Fulpagare

Rajasthan Election 2023 : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडतोय. प्रचार तोफा धडाडत आहेत. अशातच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या दिल्ली सोडून जयपूरला पोहोचल्याने चर्चांना उधाण आलं आहे. पण सोनिया गांधी यांच्या या जयपूर दौऱ्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी महत्त्वाची माहिती दिली. सोनिया गांधींचा हा दौरा पूर्णपणे व्यक्तिगत आहे, असं जयराम रमेश यांनी सांगितलं आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या काळात सोनिया गांधी जयपूरला आल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय दृष्टीकोनातून बघितलं जात आहे.

दिल्लीत सध्या वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या वायू प्रदूषणामुळेच २०२० मध्ये सोनिया गांधी या गोव्याला गेल्या होत्या. याशिवाय त्या कायम शिमल्याला जात असतात. तिथे प्रियांका गांधी यांचे घर आहे. शिमल्यात थंडी खूप असल्याने आता सोनिया गांधी तिथे जात नाहीत. सोनिया गांधींना श्वसनासंबंधी आजार आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी स्वच्छ हवा असेल, अशा ठिकाणी जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबरला प्रचार संपणार आहे. सोनिया गांधी यांच्यासोबत राहुल गांधीही असणार आहेत. राहुल गांधी हे जयपूरमध्ये असतील. १६, १९, २१ आणि २२ नोव्हेंबरला राजस्थानमध्ये प्रचार करणार आहेत, अशी माहिती जयराम रमेश यांनी दिली. तसंच वायू प्रदूषणामुळे त्या दिल्ली सोडत असल्याचंही जयराम रमेश यांनी सांगितलं.

सोनिया गांधी प्रचारासाठी बाहेर पडणार नाहीत. पण राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सलग जयपूर दौऱ्यात सोनिया गांधींची उपस्थिती ही एक राजकीय रणनितीचा संकेत असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT