Madhya Pradesh Election : देशातील पाच राज्यांत सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममधील होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावत आहेत.
सध्या मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला आहे. मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजपमध्ये संघर्ष होत आहे. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका सभेत बोलताना मध्य प्रदेशात काँग्रेस किती जागा जिंकेल, याबाबात मोठा दावा करत थेट आकडेवारीच सांगितली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"काँग्रेसने कर्नाटक, हिमाचलमध्ये भाजपला पळवून लावलं. आता मध्य प्रदेशमध्येदेखील भाजपला पळवून लावायचं आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे वादळ येणार आहे. काँग्रेसला मध्य प्रदेशातील जनता 145 ते 150 जागा देतील, लिहून ठेवा. कारण मी मध्य प्रदेशमध्ये खूप दौरे केले आहेत," असा मोठा दावा राहुल गांधींनी केला.
"नरेंद्र मोदी, अमित शाह, शिवराजसिंह चौहान यांनी आमदार विकत घेऊन मध्य प्रदेशातील निवडून आलेलं सरकार चोरलं. काँग्रेसचे आमदार कोट्यवधी रुपयांना विकत घेतले. तुमचा निर्णय आणि तुमचा आवाज भाजपच्या नेत्यांनी चिरडून टाकला. तुमची फसवणूक केली," असा आरोपही राहुल गांधींनी भाजपवर केला.
दरम्यान, मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे राजकीय नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत, तर राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता मध्य प्रदेशात कोणत्या पक्षाचे सरकार येणार, हे निवडणुकीच्या निकालानंतरच समोर येणार आहे.
Edited by : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.