Uttar Pradesh Liquor sarkarnama
देश

Akhilesh Yadav On BJP : दारूच्या बाटल्यांवर भाजप नेत्यांची छायाचित्र; उत्तर प्रदेशातील उमेदवाराचा 'प्रताप', अखिलेश यादव संतापले...

Pradeep Pendhare

Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीचा घमासान सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे अमिष दाखवले जाऊ लागलेत. यातच भाजप (BJP) उमेदवाराने गिफ्ट पॅक करून त्यावर बड्या नेत्याचे छायाचित्र छापून दारूच्या बाटल्या वाटप केल्याचा प्रकार समोर आला. यावरून सपचे अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बांदा-चित्रकुट लोकसभा मतदारसंघातील या प्रकाराचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. दारूच्या बाटलीवर केलेल्या गिफ्ट पॅकवर भाजप उमेदवार खासदार आरके पटेल यांच्यासह भाजप BJP नेत्याचे छायाचित्र छापलेले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशामधील विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली. पोलीस अधीक्षक अरुण सिंह यांनी व्हिडिओची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, भाजप उमेदवार खासदार आरके पटेल यांनी ही विरोधकांनीच बदनामीसाठी केलेला प्रयोग असल्याचे म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

व्हायरल झालेला व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गिफ्ट पॅकमध्ये केलेली दारूची बाटली घेऊन फिरत आहे. त्या गिफ्ट पॅकवर छापलेल्या छायाचित्र दाखवत आहे. नाव घेत आहे. येथे विकास जास्त झाला आहे. त्यामुळे दारूच्या बाटलीला गिफ्टमध्ये पॅक करून त्यावर नेत्यांचे छायाचित्र छापून प्रचार केला जात आहे. व्हिडिओमध्ये इतर लोकांचे आवाज देखील येत आहेत. परंतु एकाचाही चेहरा दिसत नाही. Distribution of liquor bottles to attract voters in Uttar Pradesh

अखिलेश यादव यांच्याकडून कारवाईची मागणी

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव Akhilesh Yadav यांनी या प्रकारावर कारवाईची मागणी केली आहे. तसा हा व्हिडिओ ट्विट केला आहे. 'भाजपने सर्व चुकीचे रस्ते बरोबर घेऊन निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु जनतेने ठरवले आहे की, यावेळी भाजपला (BJP) बाटलीमध्ये बंद करून ठेवायचे. नकारात्मक पसरवणाऱ्या भाजपने लक्षात घ्यावे, दारूच्या बाटल्या वाटून मतदान बदलू शकत नाही', असेही अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT