Congress Latest News, BJP Latest Marathi News, Tripura Bypoll Result Sarkarnama
देश

Congress : गोव्यात एकनाथ शिंदे पॅटर्नच्या चर्चेनं खळबळ; काँग्रेसची 'शिवसेना' होणार?

गोव्यातील काँग्रेसचे अकरापैकी आठ आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्यातील काँग्रेसमागे लागलेले फुटीचे ग्रहण सुटण्याचे नाव घेत नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) ऐतिहासिक बंड केलं. तब्बल 40 आमदारांचं समर्थन मिळवत त्यांनी महाविकास आघाडी सरकार उलथवलं. गोव्यातही काँग्रेसमध्ये बंडाचे वारे वाहू लागले आहेत. तिथे भाजपचं (BJP) सरकार कोसळणार नसलं तरी ताकद वाढणार असल्याची चर्चा आहे. (Goa Congress Latest News)

काँग्रेसचे 11 पैकी आठ आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचे चर्चेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेससाठी माजी मुख्यमंत्री गुरूदास कामत हे एकनाथ शिंदे ठरण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत ते अनुपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

काही महिन्यांपूर्वीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. पक्षाला केवळ अकरा जागांवर समाधान मानावे लागले. पण मागील निवडणुकीनंतर पक्षाला पडलेल्या खिंडारानंतरही हे यश पक्षाला मिळालं. प्रचारादरम्यान पक्षाने सर्व उमेदवारांना शपथ दिली. त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले की, निवडून आल्यानंतर किंवा पराभूत झाल्यानंतर इतर पक्षात जाणार नाही.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रचारादरम्यान काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत, असा प्रचार केला होता. या निवडणुकीनंतर आता काही महिन्यातच काँग्रेसमधील आठ आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. काँग्रेस नेत्यांकडून मात्र या अफवा असल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, 'सरकारकडून अफवा आणि संभ्रम पसरवला जात आहे. आण्ही पक्षाच्या आमदारांची काही दिवसांपूर्वीच बैठक घेतली होती. या बैठकीला कामतही उपस्थित होते.' शनिवारी झालेल्या बैठकीपासून मात्र कामत दूर राहिले. त्यादिवशी कामत एका मठात गेले होते, असा खुलासाही काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT