उद्योगपती इलॉन मस्क आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची दोस्ती तुटल्यानंतर त्यांच्या बाजूने आणि विरोधात असणाऱ्या अनेक व्यक्तींच्या प्रतिक्रिया येत आहेत. मस्क आणि ट्रम्प दोन्ही ताकदवान व्यक्तींच्या लढाईत आता अमेरिकेतील पॉवर कपलने उडी घेतली आहे. त्यामुळे ट्रम्प-मस्क वाद अधिकच मजेदार बनत आहे.
स्टीफन मिलर आणि केटी मिलर असे या पती-पत्नीचे नाव आहे. स्टीफन हे विश्वासू मित्रासारखे ट्रम्पचे पाठीराखे आहेत, तर केटी यांनी मस्क यांचे समर्थन केले आहे. स्टीफन हे राष्ट्री सुरक्षा सल्लागार असून ट्रम्प यांचे निकटवर्तीय मानले जातात.
अमेरिकेच्या धोरण विभागाचे उपसंचालक आहेत. 2009 मध्ये ते अवैध परदेशी नागरिकांच्याविरोधात आवाज उठवत आहेत. 2016 मध्ये ट्रम्प जेव्हा पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हापासून स्टीरन मिलर हे त्यांचे संबध घनिष्ठ होत गेले. अवैध परदेशी नागरिक आमि मुस्लिमांच्या विरोधात ट्रम्प यांनी घेतलेली भूमिका यामागे स्टीफन हे मास्टरमाइंड असल्याचे बोलले जाते.
स्टीफन यांनी पत्नी केटी या मस्क यांच्या DOGE विभागात सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. मस्क यांच्यासोबत पूर्णवेळ काम करण्यासाठी केटी यांनी व्हाइट हाऊसमधील आपले पद सोडले होते. मे 2025 मध्ये मस्क हे DOGE मधून बाहेर पडल्यानंतर केटी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी मस्क यांच्या टेस्ला आणि स्पेसएक्स या कंपन्यामध्ये मोठी जबाबदारीचे पद सांभाळत आहेत.
अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती माइक पेंस याची प्रेस सेक्रेटरी म्हणून केटी यांनी काम केले आहे. केटी या आपल्या सोशल मीडिया अकाऊंट x वरुन सातत्याने मस्क यांचे कौतुक करणाऱ्या पोस्ट शेअर करीत आहेत. मस्क यांच्या कंपन्या टेस्ला आणि स्पेसएक्स यांच्या प्रचार त्या करीत आहेत.
ट्रम्प आणि मस्क यांच्यापैकी एकाची निवड करण्याचे आवाहन केटी यांच्यासमोर होते, तेव्हा त्यांनी मस्क यांची निवड केली, असे व्हाईट हाऊसमधील एकाने नाव प्रसिद्ध न करण्याची अटीवर सांगितले. दुसरीकडे केटीचे पती स्टीफन हे ट्रम्प यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्यामागे उभे आहेत. अशातच मस्क यांनी स्टीफन मिलय यांना एक्सवर अनफॉलो केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.