Chandrayaan-3 : Narendra Modi Give Task :  Sarkarnama
देश

Chandrayaan-3 : आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेल्या खगोलीय शास्त्रांचा अभ्यास करा; मोदींनी दिला 'होम वर्क' !

Narendra Modi Give Task : जेव्हा पृथ्वीच्या आकारावरून संभ्रम होता, तेव्हा आपल्या पूर्वजांनी..

सरकारनामा ब्यूरो

Bengaluru News : चांद्रयान-3 मोहिमेने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंगसह महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या यशाला 'नव्या भारताची पहाट' म्हटले आहे. आज सकाळी (दि. २६ ऑगस्ट) आपला परदेश दौरा आटोपल्यानंतर मोदी थेट भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या ट्रॅकिंग आणि कमांड सेंटरमध्ये जाऊन शास्त्रज्ञांना शुभेच्छा देण्यासाठी पोहचले, यावेळी त्यांनी तरूणांकडून आणि विद्यार्थ्यांना घरचा अभ्यास दिला आहे. (Latest Marathi News)

नरेंद्र मोदी म्हणाले की, "तुम्हा सर्वांना माहिती आहे की, भारताने हजारो वर्षांपूर्वी अंतराळात पाहणं सुरू केलं होतं. आपल्या इथे अनेक शतकांपूर्वीच अंतराळ पंरपरेचे आर्यभट्ट, ब्रम्हगुप्त, भास्कराचार्यांसारेखे ऋषी मुनी होऊन गेले. जेव्हा पृथ्वीच्या आकारावरून संभ्रम होता, तेव्हा आर्यभट्ट यांनी आपल्या ग्रथांत पृथ्वी आकार गोल असल्याच्या संदर्भात सविस्तर लिहले होते. त्यांनी पृथ्वीचं सुर्याभोवती आणि स्वत:भोवती फिरण्याच्या गणनेबाबतसुद्धा लेखन केलं होतं, असे अनेक रचना आपले पूर्वजांनी लिहून ठेवली आहेत."

"यामुळे मी तरूणांना, विद्यार्थ्यांना नवं टास्क देणार आहे. भारताच्या शास्त्रांमध्ये जे खगोलीय सूत्र आहे. या सूत्रांना आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करण्यासाठी, त्यांच्या नव्या पद्धतीने अध्ययन करण्यासाठी नवीन पिढी पुढे आली पाहिजे. हे आपल्या प्राचीन वारश्यासाठीसुद्धा गरजेचं आहे आणि विज्ञानासाठीही गरजेचं आहे," असे मोदी म्हणाले.

इस्रोच्या शास्त्रज्ञांना संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, "आज तुमच्यामध्ये येऊन मला आनंद होत आहे मी तुम्हा सर्वांना भेटण्यास उत्सुक होतो. ब्रिक्स कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी दक्षिण आफ्रिकेत गेलो होतो, पण माझे मन पूर्णपणे तुमच्यासोबतच होते. कधी कधी वाटतं की मी तुझ्यावर अन्याय करतोय. माझ्या घाई करण्यामुळे तुम्हाला त्रास झाला? इथे पहाटेच यायचे होते."

"आपले चांद्रयान जिथे उतरले त्या चंद्रावरील ठिकाणाला भारताने नाव देण्याचे ठरवले आहे. ते ठिकाण आता 'शिवशक्ती' म्हणून ओळखले जाईल, असेही मोदी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT