Uddhav Thackeray | Sudhir Mungandtiwar | Sharad Pawar
Uddhav Thackeray | Sudhir Mungandtiwar | Sharad Pawar Sarkarnama
देश

मुनगंटिवारांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीत काडी टाकली... आग पेटली!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यावर अन् त्यांच्या नरमाईच्या भूमिकेवर नाराज असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून होत्या. त्यानंतर काल पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही गृहमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. अशातच या घडामोडींदरम्यान आज दुपारी वळसे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बाबतचा खुलासा केला असून अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास निर्माण करणाऱ्या असून माझा माझा सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच माझे सहकारी उत्तम काम करत असल्याचेही मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले आहेत. याशिवाय शिवसेनेला गृहमंत्री पद हवं असल्याच्या बातम्यांनाही यानिमित्ताने पूर्णविराम मिळाला आहे.

मात्र या सर्व घडामोडींवर बोलताना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महाविकास आघाडीची अडीच वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये एक्स्चेंजची वेळ आली आहे का? म्हणजे राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेकडे गृहमंत्रीपद असा काही विचार सुरू आहे का? कारण राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक असल्याची अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदार चर्चा होती असाही गौप्यस्फोट त्यांनी केला.

याशिवाय त्यांनी शिवसेनेचे गृहमंत्रीपद मागणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे अशी टीका केली आहे. मुनगंटीवार म्हणाले, किरीट सोमय्या काय गृहमंत्री आहेत का? तुम्ही पुरावे जमवा. त्यानंतर संस्था ऐकत नसतील, तर न्यायालयात जा. तिकडे लगेच न्याय मिळतो. तिकडे आजही संविधानाचा सन्मान होतो. त्यासाठी गृहमंत्री पदाची काय आवश्यकता? या उलट मुख्यमंत्रीपद असताना गृहमंत्रीपद मागणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे अशी अवस्था आहे, अशीही टीका त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT