Sukanya Samriddhi Yojana Sarkarnama
देश

Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेला 10 वर्षे पूर्ण; जाणून घ्या कसे उघडायचे खाते, काय होईल फायदा?

Sukanya Samriddhi Yojana Eligibility : केंद्र सरकारच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. आज, म्हणजे २२ जानेवारी २०१५ रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली.

Rashmi Mane

केंद्र सरकारच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. आज, म्हणजे २२ जानेवारी २०१५ रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली. या योजनेचा उद्देश देशातील मुलींना आर्थिक सुरक्षा आणि सामाजिक सक्षमीकरण देणे हा होता. या योजनेची सुरुवात झाल्यापासून तिची लोकप्रियता कायम वाढत गेली. मुलींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.

पालकांना त्यांच्या मुलींचे सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यास मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. सुकन्या समृद्धी योजना ही एक अतिशय अनोखी योजना आहे. कारण पालक त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी सुरुवातीपासूनच या योजने अंतर्गत सहज पैसे वाचवू शकतात. या योजनेचा कालावधी मुलगी २१ वर्षांची होईपर्यंत आहे. मुलगी २१ वर्षांची झाल्यावर जमा केलेली रक्कम थेट तिच्या खात्यात हस्तांतरित केली जाते.

10 वर्षांत 4 कोटींहून अधिक खाती उघडली गेली.

या योजनेचा लोकांवर जबरदस्त परिणाम झाला. पालकांनी किंवा जवळच्या नातेवाईकांनी त्यांच्या मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी या योजनेत गुंतवणूक केली. गेल्या 10 वर्षांत 4 कोटींहून अधिक सुकन्या समृद्धी खाती उघडण्यात आली आहेत.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

सुकन्या समृद्धी योजनेला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आज आपण 'बेटी बचाओ बेटी पढाओ' मोहिमेला १० वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहोत. गेल्या दशकात, ही योजना एक परिवर्तनकारी, लोक-केंद्रित उपक्रम बनली आहे. सर्व क्षेत्रातील लोकांनीही यात सहभाग घेतला आहे.”

खाते कोण उघडू शकते?

या योजनेअंतर्गत, मुलीच्या जन्मानंतर लगेचच खाते उघडता येते. यामध्ये खाते उघडण्यासाठी मुलीचे कमाल वय १० वर्षे आहे. जर वय यापेक्षा जास्त असेल तर या योजनेचे खाते उघडले जाणार नाही. या योजनेअंतर्गत, पालक पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडू शकतात. खाते उघडल्यापासून 15 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी ही रक्कम जमा करता येते. ते 250 रुपयांपासून सुरू होऊ शकते. या योजनेअंतर्गत, दरवर्षी फक्त 1,50,000 लाख रुपयांपर्यंतच रक्कम जमा करता येते. जर तुम्ही यापेक्षा जास्त पैसे जमा केले तर तुम्हाला त्यावर व्याज मिळणार नाही.

वर्धापन दिनानिमित्त होणार वेगवेगळे कार्यक्रम

राज्यात बेटी बचाओ-बेटी पढाओच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त, २२ जानेवारी ते ८ मार्च २०२५ या कालावधीत विविध उपक्रम आणि जागरूकता कार्यक्रम आयोजित केले जातील. या कालावधीत, पहिल्या आठवड्यात, 181 आणि चाइल्ड हेल्पलाइन 1098 द्वारे सामान्य लोकांना मासिक पाळीच्या स्वच्छतेचे व्यवस्थापन, सॅनिटरी पॅडचे वितरण, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सॅनिटरी पॅड मशीन बसवणे, लिंग संवेदनशीलता, गर्भधारणा या विषयी जागरूकता निर्माण केली जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT