Nitin Gadkari : गडकरींनी गोव्याला काही कमी पडू दिलं नाही..., मुख्यमंत्री सावंत असं का म्हणाले?

CM Pramod Sawant on Gadkari : मंगळवारी गोव्यातील ४ हजार २०० कोटी रुपयांच्‍या विविध पाच प्रकल्‍पांचे भूमिपूजन व एका प्रकल्‍पाचे लोकार्पण नितीन गडकरी यांनी केलं.
 Nitin Gadkari
Nitin Gadkarisarkarnama
Published on
Updated on

भारताच्या पायाभूत सुविधांच्या महत्त्वपूर्ण विकासात महत्त्वपूर्ण योगदान असणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितीन गडकरी, मंगळवारी गोव्यातील ४ हजार २०० कोटी रुपयांच्‍या विविध पाच प्रकल्‍पांचे भूमिपूजन व एका प्रकल्‍पाचे लोकार्पण केलं.

या कार्यक्रमात बोलताना निसर्गसंपन्न गोव्यात रस्‍तेअपघात कमी व्हावेत यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला हवेत. राष्ट्रीय महामार्ग आणि इतरही रस्त्यांवरील ‘ब्लॅक स्पॉट’ शोधा, तसेच रस्त्यांवर वन खात्याच्या सहकार्याने झाडे लावून गोव्याला प्रदूषणमुक्त करा, असा सल्ला केंद्रीय रस्‍ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिला.

गडकरी म्हणाले, स्व. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) हे मुख्यमंत्री असताना मी केंद्रीय बंदरविकासमंत्री होतो. त्यावेळी त्‍यांनी एमपीटीवरील वाहतूक कोंडीचा विषय मांडला होता. तेव्हापासून या प्रकल्पाला सुरवात झाली होती प्रकल्पाला विलंब झाला, पण त्याचे आज उद्‌घाटन करताना मला आनंद होत आहे, अशी भावना गडकरी यांनी व्यक्त केली.

 Nitin Gadkari
Sambhajiraje Chhatrapati : वाल्मिक कराडचे 'आका'शी कनेक्शन असतांना अजितदादा त्यांना सरंक्षण का देताहेत; संभाजीराजेंचा सवाल

645 कोटींच्‍या या प्रकल्पाची 19 पैकी 13 किलोमीटरची कामे यापूर्वीच पूर्ण झालेली आहेत. मी विद्यार्थिदशेत गोव्यात आलो तेव्हा वाहतूक कोंडी अनुभवली आहे. आता गोव्यातील ही समस्‍या निश्‍चितपणे कमी होईल, असा विश्‍‍वासही त्‍यांनी व्‍यक्त केला.

गडकरींनी आत्तापर्यंत गोव्‍याला दिले 40 हजार कोटी

नितीन गडकरी यांनी गोव्यासाठी आत्तापर्यंत 40 हजार कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे समस्त गोवानासियांवर त्यांचे मोठे उपकार आहेत. ते उपकार कधीही विसरता येणार नाहीत. तसेच राज्‍यात 550 कोटींची विकासकामे सुरू आहेत. रस्ता हा विकासाचा आरसा आहे. त्यामुळे गडकरींच्या दूरदृष्टीमुळे गोव्यातील रस्‍त्‍यांचा चेहरामोहरा बदलला आहे, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले

 Nitin Gadkari
Shivsena UBT News : खैरेंचे लोटांगण, दानवेंची थेट भेट सगळं वाया; 'ते' नगरसेवक पक्ष सोडून जाणारच!

गोव्‍याला 11 वर्षांत 40 हजार कोटी

गेल्या 11 वर्षांत गोव्‍याला 40 हजार कोटी मिळणे हे फक्त ‘डबल इंजिन’ सरकारमुळे शक्य झाले. गेल्या 50 वर्षांत हे शक्य झाले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यांचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. नितीन गडकरी यांनीही गोव्याला काही कमी पडू दिले नाही, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा, आमदार संकल्प आमोणकर, दाजी साळकर, उल्हास तुयेकर व मान्यवर उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com