Sunny Leone_Donald Trump 
देश

Sunny Leone on Trump: "आता तर बोलायलाच नको"; ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीनं केला धक्कादायक दावा

Sunny Leone on Trump: भारत आणि अमिरेकेत सध्या टॅरिफवॉर सुरु आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दादागिरीचा आणि मुजोर वागणुकीचा भारताला मोठा फटका बसला आहे.

Amit Ujagare

Sunny Leone on Donald Trump: भारत आणि अमिरेकित सध्या टॅरिफवॉर सुरु आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दादागिरीचा आणि मुजोर वागणुकीचा भारताला मोठा फटका बसला आहे. केवळ भारतातच नव्हे तर खुद्द अमेरिकेतही ट्रम्प यांच्या धोरणांवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. त्यातच आता अभिनेत्री सनी लिओनीनं ट्रम्प यांच्याबाबत धक्कादायक दावा केला आहे. भारतासारखीच अमेरिकेतलीही राजकीय परिस्थिती असल्याचं सूचक विधान तिनं करताना सडेतोड भूमिका मांडली आहे. बीबीसीशी मुलाखतीदरम्यान तिनं हे भाष्य केलंय.

सनीनं नेमकं काय म्हटलंय?

सनी लिओनीनं म्हटलं की, कोविडच्या काळात आमच्या घरामध्ये एक नियम होता. त्यावेळी मी कॅलिफोर्नियात राहत होते. ज्या ठिकाणी ट्रम्प यांच्याविरोधात वातावरण होतं. आम्ही हे ठरवलं होतं की, जेव्हा आपण आपल्या मित्रांना गेट-टुगेदरसाठी घरी बोलावू तेव्हा त्यांच्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा होणार नाही याची काळजी घेऊयात. जशी राजकारणावर चर्चा सुरु होते मैत्री धोक्यात येते.

सर्वजण एकतर ट्रम्प यांच्या बाजुनं बोलतात अन्यथा त्यांच्याविरोधात बोलतात. सध्याची परिस्थिती अशीच आहे की, मध्यम मार्गच शिल्लक राहिलेला नाही. कारण लोक एकतर ट्रम्प यांच्याप्रती राग व्यक्त करतात किंवा त्यांच्यावर प्रेम व्यक्त करतात. मी हा प्रश्न थोडासा फिरवू इच्छिते. मला फक्त याचीच आशा वाटते की, आपण पुन्हा त्या काळात परत यायला हवं जिथं आपण आपल्या नेत्यांवर प्रेम केलं पाहिजे.

आता बोलायचंही नाही...

सनीनं पुढे म्हटलं की, डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत काही गोष्टी मला आवडतात. काही बाबतीत मी विचार करते की आता बोलायचं बंद करायला पाहिजे. आता अर्थव्यवस्थेची घौडदौड पुन्हा सुरु होईल? असं विचारल्यास मला वाटतं सुरु होईल. पण त्याची किंमत काय असेल? त्या सवलांनंतर काय बदलेल? मला खरोखरच असं वाटतं की, जे काही होत आहे त्यात काही गोष्टी या उगाचच होत आहेत. तर काही गोष्टी या अगदीच बरोबर आहेत. मी त्या मध्यम मार्गावरील व्यक्ती सारखी आहे ज्याला वाटतं की, आपण त्या व्यक्तीवर प्रेम करावं ज्याला आपण निवडलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT