
Vijay Wadettivar : काँग्रेसच्या नवनियुक्त कार्यकारिणीची पुण्यामध्ये आज बैठक होत आहे. या बैठकीच्या निमित्त काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नव्या कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. आज या बैठकीच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे नेते विजय वडट्टीवार यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांच्या मानसिकतेवर भाष्य केलं.
वडेट्टीवार म्हणाले, "नव्याने जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारणीत काही जुने आणि काही नवीन चेहरे आहेत. नवीन लोकांना कार्यकारणीमध्ये संधी देणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने शुभमन गिलच्या नेतृत्वात इंग्लंडमध्ये भारताने विजय मिळवला. भारताकडून नवोदित खेळाडूंना संधी देण्यात आली आणि त्यांनी संधीचं सोनं केलं तसंच आपण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या नेतृत्वात विजय मिळवणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. त्यासाठी पक्ष संघटन मजबूत करण्याची आवश्यकता आहे.
संघटन मजबूत असेल तर पक्ष मजबूत होतो आणि सत्ता येते. संघटनात्मक एकी दाखवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आंदोलन करतो. मात्र आंदोलनास तेच ते चेहरे दिसतात, नवीन चेहरे दिसतच नाही. आता नवीन चेहरे जोडण्याची आवश्यकता आहे"
सामान्य लोकांच्या प्रश्नासंदर्भात आंदोलन केल्यास सामान्य लोक आपल्याशी जोडले जातील. कोल्हापूरमधील माधुरी हत्तीणीचं आंदोलन आपण पाहिलं कोल्हापुराकरांनी दिलेल्या लढ्यामुळे आता माधुरीला पुन्हा आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा प्रकारे लोकांच्या निगडित प्रश्नांवरती आंदोलन करणे आवश्यक आहे.
वडेट्टीवार पुढे म्हणाले, भाजपचे 5 लोक भेटले तर ते जिंकवण्याचा विचार करतात. मात्र, आपले काँग्रेसचे पाच लोक भेटतात तेव्हा त्याला पडायचा कसा? याचा विचार करतात. हा भाजप आणि आपल्यातला फरक आहे. म्हणून आता 5 लोकांमध्ये भेटले तर अजिंक्यचा विचार करा असा सल्ला त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये काही जास्त फरक नाही. फक्त 35 खासदारांचा फरक आहे आणि आता राहुल गांधी यांचा ग्राफ वर जात आहे. दरम्यानच्या काळात काँग्रेसमधील काही लोकांना अमिष दाखवून भाजपनं स्वतःकडं घेतलं सुरुवातीला मोठं चॉकलेट दाखवलं. मात्र, त्यानंतर आता छोटं चॉकलेट देऊन त्यांना गप्प बसवण्यात आलं आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.