MK Stalin, Rajinikanth Sarkarnama
देश

Rajinikanth : दात पडले तरी काही लोक..! रजनीकांत यांच्या एका ‘फाइट’ने राजकारण ‘टाइट’

DMK MK Stalin Durai Murugan : रजनीकांत यांनी एम. के. स्टॅलिन यांचे कौतुक करताना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांविषयी केलेल्या विधानावरून राजकारण तापले आहे.

Rajanand More

Tamil Nadu : दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांच्या एका विधानावर तमिळनाडूतील राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे कौतुक करताना त्यांनी एकप्रकारे डीएमके पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना डिवचले. त्यानंतर नेत्यांनीही रजनीकांत यांच्यावर कडक शब्दांत पलटवार केला आहे.

माजी मुख्यमंत्री व डीएमकेचे संस्थापक एम. करुणानिधी यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन रजनीकांत यांच्या हस्ते दोन दिवसांपूर्वी झाले. यावेळी स्टॅलिन आणि आणि त्यांचे पुत्र उदयनिधी उपस्थित होते. रजनीकांत यांनी स्टॅलिन यांनी वडिलांच्या निधनानंतर डीएमके पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना चांगल्याप्रकारे हाताळल्याचे विधान केले.

काय म्हणाले रजनीकांत?

कार्यक्रमात बोलताना रजनीकांत म्हणाले होते की, एका शाळेच्या शिक्षकासाठी (स्टॅलिन) नवीन विद्यार्थी हाताळताना काहीच अडचण नसते. पण जुने विद्यार्थी (ज्येष्ठ नेते) हाताळणे सोपे काम नसते. इथे (डीएमके) अनेक जुने विद्यार्थी आहेत. ते साधेसुधे नाहीत. गुणवंत विद्यार्थी आहेत, ते वर्ग सोडालया तयार नसतात. त्यांना कसे सांभाळले? विशेष करून दुराई मुरुगन.

तुम्ही दुराई मुरुगन यांना काही विचारले तर ते चांगले असे म्हणतील. पण ते हे आनंदित होऊन बोलत आहेत की संतापून, याबाबत आपला गोंधल उडेल. स्टॅलिन सर, सगळं हाताळत असल्याबद्दल तुम्हाला सलाम, अशा शब्दांत रजनीकांत यांनी स्टॅलिन यांचे कौतुक केले. पण त्यावरून राजकारण सुरू झाले आहे.

मुरुगन संतापले

रजनीकांत यांचे कौतुकाचे बोल मुरुगन यांच्या जिव्हारी लागले. त्यांनी रजनीकांत यांच्यावर पलटवार करताना थेट वय काढले. ते म्हणाले की, ‘असाच विचार केला तर ज्येष्ठ अभिनेत्यांमुळे नवी कलाकारांची संधी हिरावली जात आहे. दात पडल्यानंतर आणि दाढी वाढल्यानंतरही ते काम करत आहेत.’   

आम्ही चांगले मित्र

मुरुगन यांच्या विधानानंतर रजनीकांत यांनी ते आपले जुने मित्र असल्याचे सांगितले. ते काहीही म्हटले असले तरी काहीच अडचण नाही. आम्ही मैत्री पुढे कायम राहील, असे म्हणत रजनीकांत यांनी विषय संपवून टाकला. मुरुगन यांनीही जिव्हारी लागलेल्या शब्दांवर सारसारव करताना रजनीकांत आपले मित्र असल्याचे सांगितले. आमच्या विनोदी बोलण्याचा अर्थ आमच्यात शत्रुत्व आहे, असा काढू नये. आधीप्रमाणेच आम्ही चांगले मित्र आहोत, असे मुरुगन म्हणाले.

उदयनिधीही बोलले

आमच्याकडे येण्यासाठी युवक उत्सुक आहेत. आम्ही त्यांना संधी देत आहोत. सुपरस्टार रजनीकांत यांच्या भाषणाला मोठा प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नेत्यांनीही आपल्या भाषणात कौतुक केल्याचे सांगत उदयनिधी यांनी त्यावर अधिक बोलणे टाळले.

भाजपची टीका

भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी मात्र रजनीकांत यांच्या भाषणाचा अर्थ काढताना डीएमकेमध्ये जुन्या-नव्या नेत्यांमध्ये वाद असल्याचे सांगितले. सुपरस्टार रजनीकांत यांचे भाषण म्हणजे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. दुराई मुरूगन आणि ई. व्ही. वेलू असताना उदयनिधी स्टॅलिन यांच्या ताब्यात पक्ष गेल्यानंतर वाद उफाळून येऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT