Ladakh Politics : काश्मीरमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागताच लडाखसाठी मोठा निर्णय; अमित शाहांकडून घोषणा

Modi Government New Districts Amit Shah : जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर लडाखला केंद्र सरकारने केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा दिला आहे.
Amit Shah
Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काही दिवसांतच केंद्र सरकारने लडाखबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लडाखमध्ये पाच नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा केली आहे. लडाख हा केंद्रशासित प्रदेश आहे.

अमित शाह यांनीच या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यानुसार लडाखमध्ये जांस्कार, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे पाच नवीन जिल्हे असतील. जांस्कार आणि द्रास हे जिल्हे कारगील विभागात आहेत. तर शाम, नुब्रा आणि चांगथांग हे जिल्हा लेह विभागातील आहेत.

लडाखमध्ये आतापर्यंत केवळ लेह आणि कारगील हे दोनच जिल्हे होते. गृह मंत्रालयाच्या निर्णयानंतर आता एकूण सात जिल्हे झाले आहेत. लडाखला काश्मीरपासून वेगळे केल्यानंतर सातत्याने जिल्ह्यांची संख्या वाढवण्याची मागणी होत होती. त्यावर सरकारने शिक्कामोर्तब केले आहे.

Amit Shah
Kangana Ranaut : शेतकरी आंदोलनाने बांगलादेशसारखी स्थिती झाली असती! कंगनाला भाजपने सुनावले

अमित शाह यांनी एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित आणि समृध्द लडाखच्या व्हिजनला पुढे नेत केंद्रीय गृह मंत्रालयाने पाच नवीन जिल्हे बनविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांसाठी बनविण्यात आलेल्या कल्याणकारी योजना मजबूत शासनाच्या माध्यमातून लोकांच्या दारापर्यंत नेल्या जातील.

दरम्यान, केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी तत्कालीन जम्मू आणि काश्मीर या राज्याचे दोन केंद्र शासित प्रदेशांमध्य विभाजन केले. एक लडाख आणि दुसरा जम्मू आणि काश्मीर असे दोन केंद्र शासित प्रदेश बनविण्यात आले. पाच वर्षांपूर्वी याचदिवशी तत्कालीन राज्याला विशेष दर्जा देणारे 370 कलम हटवण्यात आले होते.  

Amit Shah
Jammu and Kashmir Election : भाजपची 44 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; दोन काश्मिरी पंडितांना तिकीट

सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. लडाखमध्येही लवकरच निवडणुकांची शक्यता आहे. नवीन जिल्हे तयार करत केंद्र सरकारने निवडणुकांचीही तयारी सुरू केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. काश्मीरचे मतदार कुणाच्या पारड्यात मते टाकणार, यावरही लडाखच्या निवडणुकांचे चित्र अवलंबून असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com