Supreme Court, Manipur Violence Saekarnama
देश

Manipur Violence Update : एका रात्रीत सहा हजार 'एफआयआर' ? मणिपूर हिंसाचारावरून 'सर्वोच्च' ताशेरे

Supreme Court And Manipur : ७ ऑगस्ट रोजी पोलीस महासंचालकांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : मणिपूरमधील हिंसाचारबाबत पोलिसांचा गलथान आणि वेळकाढूपणामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. तीन महिने झाले तरी तपासात प्रगती नसून कुणालाही अटक करण्यात आली नाही, अशा कडक शब्दात भारताचे सरन्यायाधीस धनंजय चंद्रचूड यांनी राज्य सरकारला सुनावले. तसेच मणिपूरमधील सध्याच्या स्थितीमुळे घटनात्मक यंत्रणेच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. यासह न्यायालयाने पोलीस महासंचालकांना ७ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (Latest Political News)

मणिपूरमधील वांशिक हिंसाचारावर सरकारच्या विरोधात टीका करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, "गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात घटनात्मक यंत्रणा पूर्णपणे बिघडली आहे. पोलिसांचा तपासातील उशीर आणि आळशीपणामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे." सर्वोच्च न्यायालयाच्या या ताशेऱ्यांमुळे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांना हटवून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी खंडपीठाला सांगितले की, "हिंसाचाराशी संबंधित सहा हजार ५२३ 'एफआयआर' नोंदवण्यात आले आहेत. त्यापैकी ११ महिला आणि मुलांवरील गुन्ह्यांशी संबंधित आहेत. ही माहिती राज्याच्या अहवालाचा भाग असून ती न्यायालयात सादर केली आहे. तसेच महिलांना विवस्त्र करून फिरवणे आणि सामूहिक बलात्काराप्रकरणी 'व्हायरल' झालेल्या 'व्हिडिओ'शी संबंधित प्रकरणात एका अल्पवयीन मुलासह सात जणांना अटक करण्यात आलेली आहे."

मेहतांनी दिलेल्या माहितीवर सर्वोच्च न्यायालयाने असमाधान व्यक्त केले. एका रात्रीत सहा हजाराहून अधिक 'एफआयआर' दाखल केल्याने या माहितीत काही त्रुटी असण्याची शक्यता न्यायालयाने व्यक्त केली. तसेच ती माहिती स्वीकरण्यासही न्यायालयाने नकार दिला. तसेच मेहतांनी खंडपीठाला पूर्वी १५ मे रोजी शून्य 'एफआयआर' होते तर आता थेट सहा हजाराहून अधिक तक्रारी दाखल असल्याचे म्हणतात. तसेच तर ४ मे रोजी घडलेल्या घटनेसाठी २६ जुलै रोजी 'एफआयआर' नोंदवल्याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले. तसेच महिलांना जमावाच्या स्वाधीन केल्याचा आरोप असलेल्या पोलिसांची चौकशी झाली आहे का, या प्रश्नाचे उत्तरही मेहतांना देता आले नाही.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT