Shivsena, Rahul Shevale
Shivsena, Rahul ShevaleSarkarnama

Shivsena Whip : शिवसेनेच्या खासदारांना तीन ओळींचा 'व्हिप'; ठाकरे गटाच्या भूमिकेकडे लक्ष

Shivsena In Lok Sabha : लोकसभेच्या कामकाजात पूर्ण दिवस उपस्थित राहण्याचे आदेश
Published on

Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर विषयावर संसदेत निवेदन करत नसल्याने विरोधकांनी अविश्वासाचा ठरवा सादर केला आहे. तो लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजूर केला. आता उर्वरित दिवसांत लोकसभेत विविध महत्वाची विधेयकांवर चर्चा होणार आहे. या चर्चेवेळी आणि विधेयकांच्या मतदानावेळी उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेच्या (शिंदे गट) लोकसभेतील खासदारांसाठी 'व्हिप' जारी केला आहे. (Latest Political News)

शिवसेनेचे गटनेते राहुल शेवाळे यांनी काढला तीन ओळींचा 'व्हिप' आपल्या खासदारांसाठी जारी केला आहे. संसदेत येणाऱ्या विविध बिलासंदर्भात मतदानावेळी उपस्थित राहून पक्षाच्या आदेशानुसार मतदान करण्याच्या सूचना'व्हिप'द्वारे देण्यात आल्या आहेत. तसेच देशात गाजत असलेले दिल्ली सरकारसंदर्भात महत्त्वाचे विधेयक प्रस्तावित आहे. त्याबाबत होणाऱ्या चर्चा आणि मतदानावेळी उपस्थित राहण्याच्या सूचनाही शेवाळेंनी दिल्या आहेत.

Shivsena, Rahul Shevale
Kolhapur Gokul Dudh Sangh: ठेक्यावरून 'गोकुळ'चे राजकारण पेटले; शौमिका महाडिक अन् सत्ताधारी एकमेकांसमोर ठाकले

संसदेचे अधिवेशन २० जुलैपासून सुरू झालेले असले तरी मणिपूर हिंसाचारवरून विरोधकांनी सुरुवातीपासून सभागृहात घोषणाबाजी केली आहे. परिणामी बहुतांशवेळा संभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्याची वेळ आली. या पार्श्वभूमीवर उरलेल्या दहा दिवसात महत्वाची चर्चा होऊन काही विधेयके मंजूर करण्याची शक्यता आहे. यावेळी संख्याबळ जास्त असण्यासाठी लोकसभेच्या उर्वरित दिवसात कामकाजात पूर्णवेळ सहभागी राहण्याचे आदेशही 'व्हिप'द्वारे देण्यात आले आहे.

Shivsena, Rahul Shevale
Nitin Desai Passes Away : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी उचललं टोकाचं पाऊल

ठाकरे गटाच्या भूमिकेकडे लक्ष

निवडणूक आयोगाची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मान्यता असून त्यांना मशाल हे चिन्ह दिले आहे. ही मान्यता अद्याप कायम असून या गटाने लोकसभेत वेगळा कक्ष देण्याचीही मागणी केली आहे. या गटात विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, संजय जाधव व ओमराजे निंबाळकर या खासदारांचा समावेश आहे. आता शिंदे गटाकडून जारी केलेला 'व्हिप' शिवसेनेनच्या सर्व १८ खासदारांना लागू होणार का, हा प्रश्न कायम आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नेमके कोणाला मतदान करतात आणि 'व्हिप'चे उल्लंघन करतात का नाही, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com