Supreme Court news : राजकारणात आमदार, खासदार, मंत्री होण्यासाठी नेत्यांची चढाओढ लागलेली असते. पण एक पद मिळविण्याच्या नादात आधाचेही हातातून गेल्याची उदाहरणेही देशाच्या राजकारणात पाहायला मिळतात. असाच धक्का चक्क आमदाराला बसला आहे. आमदार असताना दुसऱ्या पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढविली अन् पराभवानंतर आमदारकीही गमावण्याची वेळ या नेत्यावर आली.
तेलंगणातील खैराताबाद मतदारसंघाचे माजी आमदार दानम नागेंद्र यांच्या अपात्रतेच्या याचिकेवर गुरूवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. तेलंगणा हायकोर्टाने मागील आठवड्यातच त्यांना पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत अपात्र ठरविले होते. त्याविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका गुरूवारी फेटाळण्यात आली. सुनावणीदरम्यान कोर्टाने तुमचे प्रकरण 'आयाराम, गयाराम आणि पुन्हा आयाराम', असे असल्याची टिप्पणीही केली.
नेमकं काय घडलं?
नागेंदर हे भारत राष्ट्र समितीच्या तिकीटावर विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झाले होते. नोव्हेंबर २०२३ मध्ये ही निवडणूक झाली होती. या निवडणुकीत राज्यात काँग्रेसला बहुमत मिळाले होते. त्यानंतर काही महिन्यांत लोकसभेचे बिगुल वाजले. नागेंदर यांना काँग्रेसने सिकंदराबाद मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
प्रकरण हायकोर्टात
बीआरएसचे आमदार असतानाही काँग्रेसकडून निवडणूक लढविल्याने नागेंदर यांच्याविरोधात बीआरएसकडून विधानसभा अध्यक्षाकंडे अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आले. अध्यक्षांनी ही याचिका फेटाळल्यानंतर बीआरएसने तेलंगणा हायकोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणात हायकोर्टाने नागेंदर यांच्याविरोधात निकाल देताना अपात्रतेवर शिक्कामोर्तब केले होते. कोर्टाने २३ एप्रिल २०२४ या दिवसापासून त्यांना अपात्र घोषित केले. कोर्टाच्या या निकालाला नागेंदर यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.
मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती ज्यॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर ही याचिका होती. कोर्टाने हायकोर्टाच्या निकालात ढवळाढवळ करणार नसल्याचे सांगत याचिका फेटाळून लावली. हायकोर्टाने कायद्याचा योग्य अन्वयार्थ लावून निकाल दिल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. त्यामुळे नागेंदर यांना मोठा झटका बसला आहे. कोर्टाच्या निकालामुळे त्यांचा आमदारकीचा अधिकृत कार्यकाळ केवळ सहा महिन्यांचा राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.