New Delhi News : लोकसभा निवडणुकीदरम्यान खळबळ उडवून देणाऱ्या सेक्स स्कॅंडल प्रकरणात जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. कोर्टाने त्यांची जामीन देण्याची याचिका फेटाळून लावली आहे. कर्नाटक हायकोर्टानेही त्यांना जामीन नाकारला आहे. या निकालाला त्यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.
लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रज्वल रेवण्णा प्रकरणावरून महाराष्ट्रातही विरोधकांनी भाजपवर शरसंधान साधले होते. विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांकडून या मुद्द्यावरून महायुतीवर टीका केली जात आहे. अशातच प्रज्वल रेवण्णा यांना सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. प्रज्वल हे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आहेत.
प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात लैंगिक छळाची तीन प्रकरणे दाखल आहेत. याशिवाय अक महिलांनी त्यांच्यावर बलात्काराचे आरोप केले आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर कर्नाटकसह संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. निवडणुकीदरम्यान हे प्रकरण बाहेर आल्याने एनडीएवर नामुष्की ओढवली होती. रेवण्णा यांचा हसन लोकसभा मतदारसंघात पराभवही झाला.
घरकाम करणाऱ्या एका महिलेने प्रज्वल यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली होती. त्यांचे वडीलही या प्रकरणात आरोपी आहेत. त्यांना जामीन मिळाला आहे. दुसरे प्रकरण सीआयडीने दाखल केले आहे. यामध्ये एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. ही महिला जेडीएसची कार्यकर्ता आहे. तिसरे प्रकरणही बलात्काराचे आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रज्वल परदेशात निघून गेले होते. या प्रकरणाच्या तपासासाठी त्यावेळी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. 18 मे रोजी कोर्टाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर ते जवळपास आठवडाभराने कर्नाटकात परतले. विमानतळावरच त्यांना अटक करण्यात आले. तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत. आता सुप्रीम कोर्टाने जामीन नाकारल्याने त्यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.