Ayodhya Ram Temple : अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्याची धमकी; खलिस्तानी दहशतवाद्याचा VIDEO व्हायरल

Khalistani Terrorist Gurpatwant Singh Pannun Canada : कॅनडातील खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
Gurpatwant Singh Pannun
Gurpatwant Singh PannunSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : कॅनडात वास्तव्यास असलेल्या खलिस्तानी दहशतवाद्याच्या निशाण्यावर आता अयोध्येतील राम मंदिर आले आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू यांनी मंदिर उडवून देण्याची धमकी दिली आहे. त्याचा याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

शीख फॉर जस्टिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख पन्नू याने हा व्हिडीओ तयार केला आहे. त्यामध्ये त्याने म्हटले आहे की, ‘16 आणि 17 नोव्हेंबरला अयोध्येतील राम मंदिरात हिंसा होईल.’ पन्नू याने राम मंदिराप्रमाणे हिंदूच्या इतर धार्मिक स्थळांमध्येही हिंसा भडकवण्याची धमकी दिली आहे.

Gurpatwant Singh Pannun
Kamala Harris : पराभवानंतरही कमला हॅरिस होणार राष्ट्राध्यक्ष? अमेरिकेत काय घडतंय?

‘आम्ही हिंदुत्वाच्या विचारधारचे जन्मस्थळ असलेल्या अयोध्येचा पाया हालवून टाकू,’ असा इशाराही पन्नूने व्हिडीओतून दिला आहे. या व्हिडिओमध्ये राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी पूजा करत असतानाचे फोटो दाखवण्यात आला आहे. ‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. पन्नू याच्या या व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे.  

पन्नू याने कॅनडातील हिंदूंना धमकी दिली आहे. कॅनडातील हिंदू मंदिरांवर होत असलेल्या खलिस्तानी हल्ल्यांपासून दूर भारतीय हिंदूंनी दूर राहावे, असे पन्नूने धमकावले आहे. मागील काही महिन्यांत येथील विविध हिंदू मंदिरांवर हल्ले करण्यात आले आहेत.

Gurpatwant Singh Pannun
Kamala Harris : निवडणुकीनंतर कमला हॅरिस यांचा पक्ष कंगाल; डोनाल्ड ट्रम्प सरसावले

दरम्यान, भारताने पन्नूला 2020 मध्ये दहशतवादी घोषित केले आहे. त्याने 2007 मध्ये शीख फॉर जस्टिस या संघटनेची स्थापना केली आहे. तेव्हापासून तो भारताविरोधात सातत्याने गरळ ओकत असतो. मुळचा पंजाबमधील अमृतसरचा असलेल्या पन्नूचे संपूर्ण शिक्षण इथेच झाले आहे. चंदीगढ येथील पंजाब विद्यापीठातून त्याने विधी शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. सध्या तो कधी कॅनडामध्ये तर कधी अमेरिकेत असतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com