Aryan khan
Aryan khan Sarkarnama
देश

आर्यनच्या सुटकेस विलंब अन् सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्रुटीवर ठेवलं बोट

सरकारनामा ब्युरो

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs case) प्रकरणी आर्यन खानसह (Aryan Khan) मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट या तिघांना उच्च न्यायालयाने जामीन दिला होता. तरीही कारागृहातून त्यांच्या सुटकेस 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागला होता. यानंतर आता जामीन मिळाल्यानंतर सुटकेस होणाऱ्या विलंबावर सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) न्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड (D.Y.Chandrchud) यांनी बोट ठेवले आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात न्यायाधीश चंद्रचूड बोलत होते. ते म्हणाले की, फौजदारी न्याय प्रक्रियेत जामिनाचा आदेश देण्यातील विलंब ही अतिशय मोठी त्रुटी आहे. त्यावर तातडीने मोठी उपाययोजना करावी लागेल. कारण याचा थेट संबंध माणसाच्या स्वातंत्र्याशी येतो. खटला सुरू असलेले आरोपी अथवा शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या संदर्भात ही महत्वाची बाब आहे.

काही दिवसांपूर्वी एन.व्ही.रमणा यांनी जामिनाचा आदेश मिळण्यातील विलंबाबाबत चिंता व्यक्त केली होती. जामिनाचा आदेश कारागृहापर्यंत लवकर जावा यासाठी नवीन व्यवस्था सुरू करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले होते. सर्वोच्च न्यायालयाने डिजिटल युगाचा विचार करीत यासाठई फास्ट अँड सेक्युअर ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स (फास्टर) या प्रणालीची अंमलबजावणी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना करण्यास सांगितले होते.

अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने (NCB) आर्यनला 3 ऑक्टोबरला पकडले होते. तो 8 ऑक्टोबरपासून आर्थर रोड कारागृहात होता. आर्यनसह तिघांच्या जामिनावर तीन दिवस उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. आर्यनच्या वतीने माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. रोहतगी हे आर्यनची बाजू मांडणार असल्याचे सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर तीन दिवसांच्या सुनावणीनंतर आर्यनसह तिघांना जामीन मिळाला आहे. अखेर 30 ऑक्टोबरला आर्यनची कारागृहातून सुटका झाली होती. मुनमुन आणि अरबाझ यांची 31 ऑक्टोबरला कारागृहातून सुटका झाली होती.

उच्च न्यायालयात सलग तीन दिवस आर्यनसह तिघांच्या जामिनावर सुनावणी सुरू होती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सांबरे यांनी आर्यन, मुनमुन आणि अरबाझ या तिघांना 28 ऑक्टोबरला जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाचा जामिनाचा आदेश मिळाल्यानंतर तिघांची कारागृहातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा होणार होता. आर्यन आणि अरबाझ हे आर्थर रोड कारागृहात तर मुनमुन भायखळा महिला कारागृहात होता. न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर दोन दिवसांनी आर्यनची तर मुनमुन आणि अरबाझची 3 दिवसांनी सुटका झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT