Sanjeev Khanna Sarkarnama
देश

Supreme Court: सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांबाबत CJI संजीव खन्ना यांचा मोठा निर्णय; यशवंत वर्मा यांच्या शपथविधीला...

supreme court judge net worth cji sanjiv khanna justice yaswant varma: यशवंत वर्मा यांच्या शपथविधीला विरोध करत जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे वर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या बंगल्यात कोट्यवधीचं घबाड सापडल्यानंतर न्यायव्यवस्था हादरली आहे. देशाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी याबाबत मोठे पाऊल उचलले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी आपली संपत्ती सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी, असा आदेश संजीव खन्ना यांनी दिला आहे. वर्मा यांच्या शपथविधीला विरोध करत जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे वर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सुप्रीम कोर्टांच्या न्यायाधीशांनी आपल्या संपत्तीची माहिती सार्वजनिक करावी, अशा सूचना संजीव खन्ना यांनी दिल्या आहेत. वर्मा यांच्या बंगल्यात सापडलेल्या जळालेल्या नोटानंतर हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

1 एप्रिल रोजी झालेल्या न्यायाधीशांच्या बैठकीनंतर सरन्यायाधीशांनी हा निर्णय घेतला. यापूर्वी संजीव खन्ना यांच्यासमवेत अनेक न्यायाधीशांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली होती. पण ही माहिती सार्वजनिक करण्यात आली नव्हती. नव्या आदेशानंतर 30 न्यायाधीशांनी आपल्या संपत्तीची सुप्रीम कोर्टांच्या वेबसाईटवर माहिती सार्वजनिक केली आहे.

गेल्या महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी लाग लागली होती. यावेळी पोलिसांनी एका खोलीत जळालेल्या नोटा सापडल्या होत्या, त्यानंतर संजीव खन्ना यांनी एक समिती नियुक्ती केली आहे. वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी बदली करण्यात आली आहे. काही वकिलांनी त्याला विरोध केला आहे. याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठानं एक जनहित याचिका दाखल केली आहे. अलाहाबाद न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदाची शपथ वर्मा यांना देऊ नका, अशी याचिका त्यांनी सुप्रीम कोर्टाकडे दाखल केली आहे.

विकास चतुर्वेदी यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी उद्या (ता.4) होणार आहे. मुख्य सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी वर्मा यांची चौकशीसाठी समिती नेमली असल्याचे याचिकेत म्हटलं आहे. वर्मा यांचाी चौकशी सुरु असताना त्यांना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ देऊ नका, असे याचिकाकर्त्यांचे वकील अशोक पांडे यांनी म्हटलं आहे.

चौकशी पूर्व झाल्यानंतर त्याची अलाहाबाद येथे बदली करावी, असे आव्हान याचिकाकर्त्यानं केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या समितीने वर्मा यांच्या बदलीचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर वर्मा यांच्या बदलीचा आणि शपथविधीचा निर्णय घ्यावा, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT