Justice Sanjiv Khanna Sarkarnama
देश

Supreme Court News : माझा मुलगा तिथं शिकत होता! भावी सरन्यायाधीशांची माजी मंत्र्यांच्या खटल्यातून माघार

Sanjiv Khanna News : न्यायाधीश संजीव खन्ना हे नोव्हेंबरमध्ये सरन्यायाधीश म्हणून पदभार सांभाळणार आहे. त्यांना केवळ सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.

Rajanand More

New Delhi News : सुप्रीम कोर्टाचे (Supreme Court News) वरिष्ठ न्यायाधीश व भावी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी सोमवारी (ता. 13) माजी मंत्र्यांच्या एका खटल्यातून माघार घेतली आहे. दिल्ली सरकारमधील माजी मंत्री सत्येंद्र जैन यांनी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल स्टडीजच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षांविरोधात हा खटला दाखल केला आहे. त्यावर सोमवार न्यायाधीश खन्ना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार होती. पण त्याआधीच त्यांनी या खटल्यातून माघाल घेतली. दुसऱ्या न्यायाधीशांसमोर हा खटला चालविण्यास देताना त्यांनी कारणही दिले आहे.

न्यायाधीश खन्ना (Sanjiv Khanna) यांच्या खंडपीठासमोर आज हा खटला सुनावणीसाठी आला. त्यानंतर त्यांनी स्वत:ला या खटल्यापासून दूर करण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले, या याचिकेवर मी सुनावणी घेऊ शकत नाही. याचिकेला दुसऱ्या खंडपीठाकडे पाठवायला हवे. माझा मुलगा या कॉलेजमध्ये शिकत होता. (Supreme Court Latest News)

न्यायाधीश खन्ना यांनी खटल्यातून माघार घेताना आपल्या मुलाचे कारण दिले आहे. विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल स्टडीज या शिक्षण संस्थेविरोधात हा खटला असून त्यांच्या मुलाचेही या संस्थेतच शिक्षण झाल्याने न्यायाधीश खन्ना यांनी म्हटले आहे. आता या खटल्याची सुनावणी उन्हाळी सुट्टीनंतर आठ जुलै रोजी निश्चित करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष एस. सी. वस्त आणि सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांच्यामध्ये 2020 पासून वाद सुरू आहे. जैन हे 2020 मध्ये दिल्लीतील शूकरबस्ती मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकले होते. त्यांनी भाजपचे (BJP) उमेदवार असलेले वत्स यांचा पराभव केला होता. वत्स यांनी जैन यांच्या विरोधात भ्रष्टाचार आणि आचारसंहिता भंगाचा आरोप केला होता, तसेच हायकोर्टातही खटला दाखल केला होता. त्याविरोधात जैन यांनी दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली होती. त्यानंतर जैन यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

दरम्यान, न्यायाधीश संजीव खन्ना हे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांच्या निवृत्तीनंतर 11 नोव्हेंबर 2024 रोजी सरन्यायाधीश पदाचा कार्यभार सांभाळतील. ते 13 मे 2015 रोजी निवृत्त होतील. त्यामुळे त्यांना केवळ सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळमार आहे. ते जानेवारी 2019 मध्ये दिल्ली हायकोर्टात सुप्रीम कोर्टात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT