Supreme Court Sarkarnama
देश

Supreme Court : मुख्यमंत्री आहात म्हणून काहीही कराल का? सुप्रीम कोर्टाने फटकारले

Supreme Court cm pushkar singh dhami BJP : न्यायालय म्हणाले, या देशात सार्वजनिक विश्वास म्हणून काही सिद्धांत आहेत. कार्यकारी मंडळाच्या प्रमुखांनी जुन्या काळातील राजे सांगतील तेच करावे हे अपेक्षित नाही.

Roshan More

Supreme Court News : राज्याचे वनमंत्री आणि मुख्य सचिवांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून व्याघ्र प्रकल्पाच्या संचालकपदी मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती करणे भाजपचे उत्तरखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना भोवले आहे. धामी यांच्या मनमानी कारभारावर सुप्रीम कोर्टाने कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.

मुख्यमंत्री आहात म्हणून काही कराल का? आपण सरंजामशाहीत नाही, मुख्यमंत्री म्हणजे जुन्या काळातील राजे नव्हे ते सांगितले तेच करायचे, असा शब्दात न्यायमूर्ती बी आर गवई, पी के मिश्रा आणि के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने मुख्यमंत्री धामी यांना सुनावले.

मुख्यमंत्र्यांना विशिष्ट अधिकाऱ्याबद्दल ममत्व का? असा सवालही खंडपीठाने उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी वनसेवेतील अधिकारी राहुल यांची नियुक्ती केली पण त्यांच्यावर विभागाअंतर्गत शिस्तभंगाची कारवाई प्रलंबित आहे. त्यांची राजाजी व्याघ्र प्रकल्पात अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाऊ नये, असे नमूद सचिवांनी नमूद केले असताना मुख्यमंत्री त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, असे न्यायालयाने म्हटले.

सरकारकडून बाजु मांडणाऱ्या अधिवक्ता नाडकर्णी यांनी 3 सप्टेंबरला नियुक्तीचा आदेश मागे घेतल्याचे खंडपीठाच्या निर्देशनास आणून दिले. त्यावर न्यायालय म्हणाले, या देशात सार्वजनिक विश्वास म्हणून काही सिद्धांत आहेत. कार्यकारी मंडळाच्या प्रमुखांनी जुन्या काळातील राजे सांगतील तेच करावे हे अपेक्षित नाही.

अधिकवक्ता नाडकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेला अधिकारी चांगला आहे. त्यांच्या विरोधात काहीच नाही, असा युक्तीवाद केला. त्यावर न्यायालयाने जर काहीच नाही तर आपण त्याच्या विभागीय कारवाई का करत आहात? प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध असल्याशिवाय विभागीय कारवाई करता येत नाही, असे देखील न्यायलयाने म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT