MCD Election : दिल्लीत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; निवडणुकीत ‘आप’ला मोठा धक्का

BJP AAP Delhi Standing Committee : दिल्ली महापालिकेत सध्या आम आदमी पक्षाची सत्ता आहे. पण स्थायी समितीत भाजप वर्चस्व दाखवून दिले आहे.
MCD Election
MCD ElectionSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : दिल्ली महापालिकेत आम आदमी पक्षाची सत्ता असली तरी आता तिजोरीच्या चाव्या मात्र भाजपच्या हाती गेल्या आहे. बुधवारी झालेल्या वार्ड कमिटीच्या निवडणुकीत भाजपला 12 पैकी 7 झोनमध्ये ताबा मिळवण्यात यश आले आहे. तर आपला केवळ पाच झोनमध्ये विजय मिळाला.

निवडणुकीच्या निकालानंतर स्थायी समितीमध्ये भाजपचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले. महापालिकेत स्थायी समितीला विविध मोठे निर्णय घेण्याचा अधिकार असतो. त्यामुळे आता पालिकेत आपची सत्ता असली तरी भाजपचा वरचष्मा राहणार असल्याचे दिसते.

MCD Election
Haryana Assembly : भाजपची पहिली यादी जाहीर! 17 आमदार आणि 8 मंत्र्यांना पुन्हा संधी

बुधवारी झालेल्या निवडणुकीत 12 पैकी तीन झोनमध्ये भाजप किंवा आपने उमेदवार उतरवले नव्हते. त्यामुळे करोल बाग, सिटी एसपी आणि केशव पुरम वार्डमध्ये मतदान झाले नाही. त्यामुळे दोन वार्डमध्ये आप तर एका वॉर्डमध्ये भाजपच्या उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले.

भाजपने नरेला, सिव्हील लाईन्स, केशवपुरम, शहादरा उत्तर, नजफगड, शहादरा दक्षिण आणि मध्य झोनमध्ये विजय मिळवला. तर आपला करोल बाग, पश्चिम, दक्षिण, सिटी एसपी आणि रोहिणी झोन मिळाले. दक्षिण जोनमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याने भाजप आणि आपच्या उमेदवारांना समसमान मते मिळाले. त्यानंतर लॉटरी काढून आपच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले.

MCD Election
Haryana Election: मोठी बातमी! भाजपची काँग्रेस - 'आप'वर कुरघोडी; 'एवढ्या' उमेदवारांची पहिली यादी जाहीर

दरम्यान, डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला 134 जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपला 104 जागांवर समाधान मानावे लागले होते. आपच्या या ऐतिहासिक विजयाने भाजपची महापालिकेतील 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आली होती. पण आता पुन्हा एकदा स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजपने ताकद दाखवून दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com