Supreme Court Justice Dipankar Datta questions Rahul Gandhi’s remarks on the Indian Army and Chinese incursions during the 2020 Galwan clash.  Sarkarnama
देश

Rahul Gandhi : खरे भारतीय असे बोलणार नाहीत! सुप्रीम कोर्टाचा राहुल गांधींना जोरदार झटका

Supreme Court Questions Rahul Gandhi Over Galwan Statement : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केल्याचे विधान केले होते. त्यावरून सुप्रीम कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना फटकारले आहे.

Rajanand More

बातमीत थोडक्यात महत्वाचे :

  1. भारत जोडो यात्रेदरम्यान चीनने भारताच्या 2 हजार चौरस किलोमीटर भूभागावर कब्जा केल्याच्या विधानावर सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना तीव्र शब्दांत फटकारले आहे.

  2. कोर्टाने “खरे भारतीय असे बोलणार नाहीत” असे म्हणत, पुरावे नसताना अशा विधानांमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धक्का पोहोचू शकतो, असा स्पष्ट इशारा दिला.

  3. तथापि, सुप्रीम कोर्टाने हायकोर्टातील खटल्याला स्थगिती दिली असून उत्तर प्रदेश सरकार व याचिकाकर्त्यांना नोटीस जारी केली आहे, आणि पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर होणार आहे.

Criminal Defamation Case : काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने सोमवारी जोरदार चपराक लगावली आहे. त्यांच्या एका विधानावरून कोर्टाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करताना त्यांचे कान उपटले आहेत. खरे भारतीय असे बोलणार नाहीत, अशी टिप्पणीही कोर्टाने केली आहे. राहुल गांधींसाठी हा जोरदार झटका मानला जात आहे.

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल यांनी चीनने भारताच्या दोन हजार चौरस किलोमीटर जमिनीवर कब्जा केल्याचे विधान केले होते. त्याविरोधात उत्तर प्रदेशात त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आले आहे. या खटल्याविरोधात राहुल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी झाली.

सुनावणीदरम्यान कोर्टाने राहुल यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करताना म्हटले की, चीनने दोन हजार चौरस किलोमीटर जमिनीवर कब्जा केल्याचे तुम्हाला कसे माहिती? तुम्ही तिथे होता का? तुमच्याकडे काही विश्वासार्ह पुरावे आहेत का? तुम्ही तुम्ही असे विधान का करता?, असे प्रश्न कोर्टाने उपस्थित केले.

खरे भारतीय असे बोलणार नाहीत. जेव्हा ऑर्डरवरून संघर्ष होतो तेव्हा दोन्ही बाजूंनी जीवितहानी होणे असामान्य आहे का?, अशी टिप्पणी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी केली. तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, मग अशी गोष्टी का बोलता? तुम्ही हे प्रश्न संसदेत का विचारत नाही, असेही कोर्ट म्हणाले. त्यावर राहुल यांच्या बाजूने युक्तीवार करणारे वरिष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, त्यांनी संसदेत बोलण्यासाठी सूट मिळावी म्हणून निवडणूक लढवलेली नाही. कलम 19(1) अ नुसार राहुल गांधी प्रश्न उपस्थित करू शकतात.

राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याची आवश्यकता नाही, असा युक्तीवादीह सिंघवी यांनी केला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने हायकोर्टातील खटल्याच्या कार्यवाहीला स्थगिती देत राहुल यांना दिलासा दिला आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकार आणि याचिकाकर्त्यांना नोटीस जारी केली आहे. आता या प्रकरणावर पुढील तीन आठवड्यांनंतर सुनावणी होईल. 

वारंवार उपस्थित होणारे प्रश्न :

  1. प्रश्न: सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींच्या कोणत्या विधानावर नाराजी व्यक्त केली?
    उत्तर: चीनने भारताच्या 2,000 चौरस किलोमीटर भूभागावर कब्जा केल्याच्या विधानावर.

  2. प्रश्न: कोर्टाने राहुल गांधींना कोणती टिप्पणी केली?
    उत्तर: "खरे भारतीय असे बोलणार नाहीत."

  3. प्रश्न: राहुल गांधींनी कोणत्या कायद्याअंतर्गत आपले मत मांडण्याचा हक्क असल्याचे सांगितले?
    उत्तर: भारतीय संविधानाचे कलम 19(1)(a).

  4. प्रश्न: सुप्रीम कोर्टाने खटल्यावर काय आदेश दिला?
    उत्तर: हायकोर्टातील कार्यवाहीला स्थगिती देत संबंधितांना नोटीस जारी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT