Gold chain snatching : चोरट्यांची हिंमत वाढली; थेट महिला खासदाराचीच सोनसाखळी लंपास, प्रकरण पोहचले अमित शाह, बिर्लांपर्यंत

MP R. Sudha Reports Chain Snatching Near Poland Embassy : काँग्रेसच्या खासदार आर. सुधा यांच्या गळ्यातील सोनसाखळीवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या घटनेनंतर सुधा यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले असून लोकसभा अध्यक्षांकडेही तक्रार केली आहे.
Member of Parliament R. Sudha sustained injuries during a chain-snatching incident near the Poland Embassy in Delhi’s Chanakyapuri area.
Member of Parliament R. Sudha sustained injuries during a chain-snatching incident near the Poland Embassy in Delhi’s Chanakyapuri area. Sarkarnama
Published on
Updated on

बातमीत थोडक्यात महत्वाचे :

  1. दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरात काँग्रेसच्या महिला खासदार आर. सुधा यांच्या गळ्यातून सकाळच्या वॉकदरम्यान दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी सोनसाखळी हिसकावून चोरली.

  2. घटना संसद भवनाजवळ घडल्याने प्रकरण गंभीर बनले असून, दिल्ली पोलिसांच्या 10 पथकांकडून तपास सुरू आहे, आणि CCTV फुटेज गोळा केले जात आहेत.

  3. आर. सुधा यांनी याबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना थेट पत्र लिहून धक्का बसल्याचे नमूद केले आहे, तर प्रियांका गांधी यांनीही पाठपुरावा केला.

MP Seeks Action from Home Minister Amit Shah : पुण्या-मुंबईसह देशभरातील बहुतेक शहरांमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुचाकीवरून येणारे भामटे रस्त्यावरून पायी चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळीवर डल्ला मारत आहेत. त्यातून आता महिला खासदारही सुटलेल्या नाहीत. धक्कादायक म्हणजे दिल्लीतील संसद भवन परिसरात ही घटना घडली आहे.

दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरात सोनसाखळी चोरीची ही घटना घडली आहे. संसद भवनापासून काही अंतरावरच महिला खासदार आर. सुधा यांच्या सोनसाखळीवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. त्या तमिळनाडूतील मयीलाडूतुरै मतदारसंघाच्या काँग्रेसच्या खासदार आहेत. हे प्रकरण आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यापर्यंत पोहचले आहे.

आर. सुधा या सोमवारी सकाळी तमिळनाडू भवन परिसरात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखली ओढली आणि पसार झाला. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांची दहा पथके चोरट्याच्या मागावर आहेत.

Member of Parliament R. Sudha sustained injuries during a chain-snatching incident near the Poland Embassy in Delhi’s Chanakyapuri area.
Election Commmission : आयोगाने राहुल गांधींच्या मित्रालाच घेरलं; निवडणुकीआधीच तेजस्वी यादव यांच्या अडचणी वाढल्या...

संसद भवनापासून काही अंतरावर महिला खासदाराच्याच गळ्यातील सोनसाखळी चोरीला गेल्याने पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. दिल्लीतील पोलिस थेट केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. त्यामुळे पोलिसांकडून आता परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरांमधील फुटेज, चोरट्यांची माहिती गोळी केली जात आहे. प्रत्यक्षदर्शींचे जबाबही घेतले जात आहेत.

दरम्यान, घटनेनंतर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आर. सुधा यांना थेट लोकसभा अध्यक्षांकडे घेऊन गेल्या आणि त्यांच्याकडेही घटनेबाबत तक्रार केली. तसेच सुधा यांनी थेट सोनसाखळी चोरीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, या घटनेत माझ्या गळ्याला दुखापत झाली आहे. माझी सोन्याची चैन चोरीला गेली आहे. या घटनेमुळे मला धक्का बसला आहे.

Member of Parliament R. Sudha sustained injuries during a chain-snatching incident near the Poland Embassy in Delhi’s Chanakyapuri area.
Election Commission : निवडणूक आयोगाकडून 'त्या' अधिकाऱ्यांच्या मानधनात दुप्पट वाढ; बिहारसाठीही खास भत्ता

राष्ट्रीय राजधानीतच उच्च सुरक्षा असलेल्या भागात एक महिला सुरक्षितपणे चालू शकत नसेल, तर मग आम्हाला कुठे सुरक्षित वाटेल, असा सवालही सुधा यांनी केला आहे. दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे देशभरातील खासदारांचा वापर परिसरात असतो. असे असतानाही महिला खासदाराची सोनखाळी चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न :

  1. प्रश्न: सोनसाखळी चोरीची घटना कुठे घडली?
    उत्तर: दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरात, संसद भवनाजवळ.

  2. प्रश्न: कोणत्या महिला खासदाराच्या गळ्यातून सोनसाखळी चोरी झाली?
    उत्तर: काँग्रेसच्या तमिळनाडूतील खासदार आर. सुधा.

  3. प्रश्न: या प्रकरणात कोणती कारवाई सुरू आहे?
    उत्तर: दिल्ली पोलिसांची 10 पथके तपास करत असून CCTV फुटेज तपासले जात आहेत.

  4. प्रश्न: आर. सुधा यांनी तक्रार कोणाकडे केली?
    उत्तर: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून तक्रार केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com