
Indian election officer pay update : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक असो की बिहारमधील मतदार याद्यांची पुनर्पडताळणी... मागील काही महिन्यांपासून विरोधकांकडून भारतीय निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला जात आहे. आयोगाकडून मतांची चोरी केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून आणि प्रामुख्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून केला जात आहे. त्यातच आता आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी देशभरात मतदान अधिकाऱ्यांना मोठी खूषखबर दिली आहे. मतदान अधिकाऱ्यांच्या मानधनात तब्बल दुपटीने वाढ करण्यात आली आहे. आयोगाने प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून याबाबत घोषणा केली आहे. यापूर्वी 2015 मध्ये मानधनामध्ये वाढ करण्यात आली होती.
आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, परिपूर्ण मतदार याद्या या लोकशाहीचा पाया आहेत. त्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी (EROs), सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AEROs), BLO पर्यवेक्षक आणि बूथ स्तरीय अधिकारी (BLO) यांचा समावेश असलेली मतदार यादी यंत्रणा खूप मेहनत घेते. या यंत्रणेची निष्पक्ष आणि पारदर्शक मतदार याद्या तयार करण्यात महत्त्वाची भूमिका असते.
मतदार नोंदणी प्रक्रियेतील या अधिकाऱ्यांच्या वार्षिक मानधनात आयोगाने दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मतदार याद्या तयार आणि सुधारण्यात सहभागी असलेल्या BLO पर्यवेक्षकांचे मानधन देखील वाढवले आहे. यापूर्वी 2025 मध्ये मानधनात वाढ करण्यात आली होती. तसेच, EROs आणि AEROs साठी प्रथमच मानधन देण्यात आले आहे.
एवढेच नाही तर बिहारमधील मतदार पुनर्पडताळणी मोहिमेतील बीएलओसाठीही 6 हजार रुपयांचे मानधून विशेष प्रोत्साहन म्हणून दिले जाणार आहे. अचूक मतदार याद्या राखण्यासाठी, मतदारांना मदत करण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया बळकट करण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर अथक परिश्रम करणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी आयोग कटिबध्द असल्याचे प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
बूथ लेव्हल अधिकारी – 12 हजार (6 हजार)
बीएलओ सुपरवायझर – 18 हजार (12 हजार)
सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी – 25 हजार
मतदार नोंदणी अधिकारी – 30 हजार
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.