Supreme court, Ramdev Baba Sarkarnama
देश

Ramdev Baba News : रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; पतंजलीच्या जाहिराती थांबवल्या...

Indian Medical Association इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांच्या काही जाहिरातींच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सरकारनामा ब्युरो़

New Delhi News : बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदच्या जाहिराती फसव्या असून त्या पूर्णपणे बंद कराव्यात, असे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने सरकारला खडेबोल सुनावत 'सगळ्या देशाला तुम्ही गंडा घालताय आणि सरकार डोळे बंद करुन बसलंय,' असे खडेबोल ही न्यायालयाने सुनावले आहेत.

इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांच्या काही जाहिरातींच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी झाल्यानंतर आज न्यायालयाने याबाबतचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक या दोन्ही माध्यमातील फसव्या जाहिराती पूर्ण बंद करण्यास पतंजली आयुर्वेदला सांगितले आहे.

या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने सरकारला खडेबोल सुनावले आहेत. मागील काही सुनावणीवेळी प्रत्येक फसव्या जाहिरातीमागे एक कोटी रुपयांचा दंड घेतला जाईल, असा इशारा यापूर्वीच न्यायालयाने दिला होता. मात्र, तरीही पतंजली आयुर्वेदच्या जाहिराती थांबल्या नव्हत्या.

याप्रकरणाची सुनावणी करताना 'सगळ्या देशाला तुम्ही गंडा घालताय. सरकार डोळे बंद करून बसलं आहे,' असे ताशेरे ही न्यायालयाने ओढले आहेत. आजच्या सुनावणी वेळी सरकारच्या अनास्थेवरही कोर्टाने नाराजी व्यक्त केली. बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदच्या जाहिराती फसव्या आहेत. त्या पूर्णपणे बंद कराव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच सर्वोच्च न्यायालयाने पंतजली आयुर्वेद आणि आचार्य बालाकृष्णन यांना दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रसिद्ध केल्याप्रकरणी न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल नोटीस बजावली आहे. या कंपनीच्या जाहिराती अनेक मीडिया प्लॅटफॉर्म्सवर दाखवल्या जातात, ज्यामध्ये अनेक चुकीचे दावे केले जातात असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे म्हणणे आहे. अवमान याचिकेवर उत्तर देण्यासाठी कंपनी आणि मालक बालाकृष्णन यांना सर्वोच्च न्यायालयाने तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT