Ajit Pawar : '' बाबा रामदेव यांचा सल्ला ऐकला आणि..''; अजित पवारांनी भरसभेत सांगितला 'तो' किस्सा

Maharashtra Politics : ''बाबा बुवांचं फार ऐकू नका. त्यांना सिरियसली घेऊ नका..''
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या रोखठोक वक्तव्य आणि खास भाषणशैलीमुळे कायमच चर्चेत असतात. मागचा पुढचा कोणताही विचार न करता कधी ते आपल्याच पक्षाच्या नेते पदाधिकार्यांचे भरसभेत कान टोचतात तर कधी विरोधकांना फैलावर घेतात. आता अजित पवार हे त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. यावेळी त्यांनी बाबा रामदेव यांच्यावर निशाणा साधला आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार हे एका कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी त्यांनी बाबा रामदेव यांच्या सल्ल्याविषयी भाष्य केलं आहे.

पवार म्हणाले, बाबा रामदेव यांनी नखावर नखं घासायला सांगितली. रामदेव बाबा यांचा हा सल्ला फार मनावर घेऊ नका. मी तसंच केलं. त्यामुळे माझे केस गेले. परत नव्याने येणं तर सोडाच पण होते ते पण गेले असं अजित पवार म्हणाले.तसंच साधू संतांचं .महापुरुषांचं ऐका पण ते बाबा बुवांचं फार ऐकू नका. त्यांना सिरियसली घेऊ नका असंही आवाहन अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी केलं.

Ajit Pawar
Kasba By Election : फडणवीसांचा एक फोन अन् कुणाल - शैलेश टिळक भाजप कार्यालयात...

'' मला मूर्ख समजू नका...''

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी देणार याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्यापही उमेदवाराची घोषणा झालेली नाही. यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी चर्चांना उधाण आले असून कार्यकर्ते संभ्रमात आहेत. मात्र, यावर प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

Ajit Pawar
Kasba by-election : चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यामुळे भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंचे टेन्शन वाढले!

पवार म्हणाले, मला मूर्ख समजू नका, मी उद्याच उमेदवाराचे नाव सांगेन. उद्या सकाळी डांगे चौकात जमून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज भरला जाणार आहे.महाविकास आघाडीचा उमेदवार अर्ज भरेल. ऐनवेळीच उमेदवार घोषित करण्याचा प्रश्न नाही. उद्या सकाळी डांगे चौकात जमून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज भरला जाईल. अर्ज भरण्याच्यावेळी मी उपस्थित राहीन. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल चर्चा केलेली आहे असंही पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com