Baba Ramdev Sarkarnama
देश

Baba Ramdev : सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेवांना झापले ; 'हे' आहे कारण...

Supreme Court On Patanjali : 'खोटे बोलत असलो तर आम्हाला एक हजार कोटी रुपयांचा दंड करा'

Sunil Balasaheb Dhumal

Delhi Political News : पतंजली आयुर्वेद या हर्बल उत्पादनांचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीला अनेक रोगांवर उपचार म्हणून औषधांबद्दलच्या जाहिरातींमध्ये 'भ्रामक' दावे करत असल्याची याचिका इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) वतीने केली होती. यावर सुप्रीम कोर्टाने रामदेवबाबांच्या पतंजली कंपनीला झापले आहे. तसेच खोटा दावा केला तर प्रत्येक उत्पादनावर एक कोटींचा दंड करण्याचा इशाराही दिला आहे.

आयएमएच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने तोंडी आदेश दिले आहेत. सुनावली दरम्यान कोर्ट म्हणाले, 'पतंजली आयुर्वेदच्या अशा सर्व खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तात्काळ थांबवायला हव्यात. न्यायालय अशा कोणत्याही उल्लंघनाची गंभीर दखल घेईल.'

'पतंजली आयुर्वेदला आधुनिक वैद्यक प्रणालींविरुद्ध दिशाभूल करणारे दावे आणि जाहिराती प्रकाशित करू नयेत. एखादा विशिष्ट आजार बरा होऊ शकतो, असा खोटा दावा केल्यास खंडपीठ प्रत्येक उत्पादनावर एक कोटी रुपयांचा दंड आकारण्याचा विचार करू शकते,' असा इशारा खंडपीठाने दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने, ॲलोपॅथी आणि ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करणाऱ्यांबाबत दिशाभूल केल्याबद्दल रामदेव यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच केंद्राच्या बाजूने उपस्थित असलेल्या वकिलांना दिशाभूल करणार्‍या वैद्यकीय जाहिरातींच्या मुद्द्यावर उपाय शोधण्यास सांगितले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ५ फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान, कोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर रामदेवबाबांनीही आपले मत व्यक्त केले आहे.

रामदेवबाबा म्हणाले, "पतंजलीने जारी केलेल्या आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये सर्व आवश्यक वैद्यकीय पुरावे आहेत. खोटे बोलत असलो तर आम्हाला एक हजार कोटी रुपयांचा दंड करा. तसेच आम्ही फाशीच्या शिक्षेलाही तयार आहोत. मात्र आम्ही खोटे नाही, हे सिद्ध झाले तर आमच्याविरोधात खोटा प्रचार करणाऱ्यांना शिक्षा करावी," असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT