Supriya Sule Sarkarnama
देश

Supriya Sule News : महिलांबाबत भाजपची मानसिकता काय, हे चांगलंच माहीत; सुप्रिया सुळेंनी सांगितले दोन किस्से

Discussion On Women Reservation Bill : "इंडिया आघाडीतील नेत्यांवर टीका करता, भाजप आपल्या नेत्यांना जाब विचारणार का?"

Sunil Balasaheb Dhumal

नव्या संसदेत प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी नारी शक्ती वंदन विधेयक मांडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना धक्का दिला. या विधेयकाला लोकसभेत इंडिया आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या विधेयकाच्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयकाबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच चंद्रकांत पाटील यांच्यासह काही मंत्र्यांच्या महिलांप्रती केलेल्या विधानांची आठवण करून देत सुळेंनी भाजपचा समाचार घेतला. (Latest Political News)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने महिला विधेयक संसदेत मांडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. एकीकडे महिलांना आरक्षण देण्यावर चर्चा करायची आणि दुसरीकडे महिलांप्रती अपमानास्पद वक्तव्ये करायची, अशी भाजपची मानसिकता असल्याची टीक खासदार सुळेंनी केली. विरोधकांनी काही बोलले तर त्यांना धारेवर धरता, मग भाजपच्या मंत्र्यासह काही प्रमुख नेत्यांनी महिलांबाबत केलेल्या विधानांचे काय, असा प्रश्नही Supriya Sule सुप्रिया सुळेंनी भाजपला केला.

इंडिया (INDIA) आघाडीतील पक्षांवर सत्ताधारी आरोप करतात की, आम्ही महिलांना संधी देत नाही. त्यांना पुढे जाण्यापासून रोखत आहोत. याला उत्तर देताना काही नेत्यांच्या वक्तव्याच्या दाखल देत सुळेंनी भाजपवर कडाडून टीका केली. सुळे म्हणाल्या, 'महाराष्ट्राच्या एका भाजप राज्य प्रमुखाने मला महिला म्हणून हिणवले होते.

सुप्रिया सुळेंनी सांगितले, 'महाराष्ट्र भाजपचे प्रमुख असलेल्या एका नेत्याने ऑन कॅमेरा म्हटले होते की, सुप्रिया सुळे घरी जा, स्वयंपाक करा, देश आम्ही चालवतो. यातूनच भाजपची मानसिकता काय आहे, हे स्पष्ट होते. तसेच भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनीही माझ्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केले होते. इंडिया आघाडीतील लोकं काही बोलले तर त्यांच्यावर टीका होते. मात्र, भाजपच्या व्यक्तींकडून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींबाबत वैयक्तिक टिप्पणी करतात, हे तुम्हाला कसे चालते? याचे उत्तर द्यावे.'

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT