Prakash Ambedkar On Modi : मोदींचं महिला आरक्षण मनुस्मृतीच्या रूपात; आंबेडकरांची टीका !

Prakash Ambedkar On Narendra Modi's Women Reservation Bill : महिला आरक्षणाचे श्रेय कुणाला द्यायचे असेल, तर ते फक्त बाबासाहेबांनाच द्यावे लागेल.
Prakash Ambedkar On Narendra Modi's Women Reservation Bill
Prakash Ambedkar On Narendra Modi's Women Reservation Bill Sarkarnama
Published on
Updated on

Pipmri Chinchwad News : संसदेच्या विशेष अधिवेशनात काल मांडण्यात आलेल्या महिला आरक्षण विधेयकावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी श्रेय घेणाऱ्या भाजप आणि काँग्रेसला फटकारले आहे.

आंबेडकर म्हणाले, "आरक्षण आणि महिला सक्षमीकरणासाठी काँग्रेस अन् भाजपने काही केलेच नाही. महिला सक्षमीकरणासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनीच काम केले आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यामुळे महिला आरक्षणाचे श्रेय कुणाला द्यायचे असेल, तर ते फक्त बाबासाहेबांनाच द्यावे लागेल, असेही ते म्हणाले. (Latest Marathi News)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

Prakash Ambedkar On Narendra Modi's Women Reservation Bill
Sonia Gandhi On Women Reservation : काँग्रेसचा 'महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा; 'हे राजीव गांधींचे स्वप्न...'

"या महिला आरक्षण बिलाच्या श्रेयासाठी भांडणारी काँग्रेस आणि भाजप हे दोघेही भारतीय समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी आणि जात, लिंग, धर्म आधारित सर्व प्रकारचा भेदभाव संपविण्यासाठी बाबासाहेबांच्या क्रांतिकारी कार्याला विसरलेत आणि बगल देत आहेत," असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

"इथल्या पीडित समूहासाठी राजकीय आरक्षणाची मागणी करणारे बाबासाहेब आंबेडकर होते. काँग्रेसने पंचायतराज बिल आणण्याच्या दशकांपूर्वीच महिला सशक्तीकरणाचे सर्वात मोठे पाऊल असलेल्या हिंदू कोड बिलाचा मसुदा बाबासाहेबांनी तयार केला होता," याकडेही आंबेडकरांनी लक्ष वेधले.

Prakash Ambedkar On Narendra Modi's Women Reservation Bill
Sonia Gandhi On Women Reservation : 'महिला आरक्षणावर' सोनिया गांधी मांडणार काँग्रेसची भूमिका; मित्रपक्षांची अडचण होणार ?

"महिला आरक्षण बिलाचे आम्ही स्वागत करतो, असे म्हणतानाच आरएसएस हे एससी, एसटी विरुद्ध ओबीसी असे भांडण लावत आहे, असा आरोप आंबेडकरांनी केला आहे. तसेच मोदींना हे आरक्षण २०३४ पर्यंत द्यायचे नसून फक्त या अर्धवट, भेदभाव आणि धूळफेक करणाऱ्या बिलातून राजकीय फायदा घ्यायचा आहे," असेही ते म्हणाले.

"मोदी सरकारने आणलेलं महिला आरक्षण विधेयक मनुस्मृतीच्या रूपात आहे. कारण त्यात ओबीसी महिलांना, केंद्रशासित प्रदेशातील ओबीसींसह एससी, एसटी महिलांना वगळण्यात आले आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच ते जम्मू-काश्मीरमध्ये लागू होईल का नाही, याबद्दल त्यात काहीच म्हटलेले नाही, त्यावर जम्मू-काश्मीर देशाचा भाग नाही का?" अशी विचारणा प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

Edited By - Chetan Zadpe

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com