Nagpur NCP News : राष्ट्रवादीची अजब ऑफर; पडळकरांना जोडे मारा, अन् एक लाख बक्षीस मिळवा...

Gopichand Padalkar : आमदार पडळकर यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलनांची मालिका सुरू झाली आहे.
Shrikant Shivankar, Prashant Pawar, Anil ahirkar and Others.
Shrikant Shivankar, Prashant Pawar, Anil ahirkar and Others.Sarkarnama

Nagpur Political News : भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर आमदार पडळकर यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलनांची मालिका सुरू झाली आहे. अशात नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसने अजब ऑफर जाहीर केली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांना जोडे मारा व एक लाखाचे बक्षीस मिळवा, अशी ही ऑफर आहे. (A series of agitations have started across the state)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

आमदार गोपीचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर संबोधत राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी त्यांचा निषेध केला. पडळकर यांना राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कुणीही भर चौकात जोडे मारल्यास, त्यांचे कपडे फाडल्यास नागपूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातर्फे अशा व्यक्तीला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे पवार यांनी जाहीर केले.

चुकूनही नागपुरात पाय ठेऊ नये...

पडळकर यांनी चुकूनही नागपुरात पाय ठेऊ नये; अन्यथा त्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही या वेळी देण्यात आला. अजित पवार राज्य सरकारमधील जबाबदार पदावर आहेत. त्यामुळे सरकारमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीविरोधात पडळकरने असे वादग्रस्त वक्तव्य करणे म्हणजे बालिशपणा आहे. पडळकरची अजित पवारांवर बोलण्याची लायकीदेखील नाही.

त्याच्या चोरीची प्रकरणे काढू...

कोल्हापूर येथील त्यांच्या मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणाची माहिती काढत पाठपुरावा करण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले. नागपुरात आज, २० सप्टेंबरला आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पडळकरवर कारवाईचे आवाहन केले.

पडळकर नावाचा व्यक्ती फुकट प्रसिद्धीसाठी काहीही बडबडत असतो. धनगर समाजासाठी खूप काही केल्याचा आव आणणाऱ्या पडळकरने कोणत्याही समाजासाठी काहीही केलेलं नाही. त्याने आपली पायरी ओळखत वागावे, असे पवार यांनी सांगितले. पडळकरचा समाचार घेण्यासाठी आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. त्यासाठी आम्हीच सक्षम आहोत. त्यामुळे रोहितदादा आपण काळजी करू नका. त्या मंगळसूत्र चोराचा बंदोबस्त आम्हीच करू, असे प्रशांत पवार म्हणाले.

आम्‍ही तर त्याच्या विरोधात सप्ताह चालवणार होतो. पण सध्या गणेशोत्सव सुरू असल्यामुळे आम्ही शांत बसलो आहोत; पण नागपुरात कुठल्याही क्षणी आम्ही पडळकरचा पुतळा कुणालाही माहिती न होऊ देता जाळणार आहोत, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष विशाल खांडेकर, माजी नगरसेवक राजेश माटे, नरेश अरसडे, निलिकेश कोल्हे, शहर उपाध्यक्ष नागेश देडमुठे, महासचिव मिलिंद महादेवकर, तुषार दाभाळे, प्रकाश डोंगरे या वेळी उपस्थित होते.

Edited By : Atul Mehere

Shrikant Shivankar, Prashant Pawar, Anil ahirkar and Others.
सर्व ओबीसी नेते ‘मॅनेज’ झाले आहेत; प्रशांत पवार,पाहा व्हिडिओ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com