Surendra Koli Sucide_Nithari Murder Case 
देश

Surendra Koli: देशाला हादरवून टाकणाऱ्या निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोलीची आत्महत्या! सुप्रीम कोर्टानं केली होती निर्दोष मुक्तता

Surendra Koli Suicide : देशाला हदरवून टाकणाऱ्या निठारी हत्याकांड प्रकरणातील एक आरोपी सुरेंद्र कोली यानं आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

Amit Ujagare

Surendra Koli Suicide : देशाला हदरवून टाकणाऱ्या निठारी हत्याकांड प्रकरणातील एक आरोपी सुरेंद्र कोली यानं आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सुप्रीम कोर्टानं त्याची निर्दोष मुक्तता केली होती. हरिद्वार इथं एका झोपडीत राहत असलेल्या कोळीनं हे टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत पोलिसांनी नेमकं काय सांगितलं आहे? जाणून घेऊयात.

गेल्या काही महिन्यांपासून सुरेंद्र कोळी हा हरिद्वारमध्ये चहा विकत होता. २०२५ मध्ये सुप्रीम कोर्टानं सुरेंद्र कोळीला निठारी हत्याकांड प्रकरणी निर्दोष मुक्तता केली होती. तो जे चहाचं दुकान चालवत होता त्या दुकानातच तो गळफास घेतलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. स्थानिक लोकांनी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्यांनी पोलिसांनी याबाबत सूचना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला. यानंतर पोलिसांनी खुलासा केला की मृत पावलेल्या व्यक्तीची ओळख सुरेंद्र कोली म्हणून झाली आहे. जो अत्यंत गाजलेल्या निठारी हत्याकांड प्रकरणातील आरोपी होता. गेल्या काही काळापासून सुरेंद्र कोली हा हरिद्वारच्या भूपतवाला भागात एका झोपडीत राहत होता. तो जवळच एक चहाची टपरी चालवत होता, यावरच तो आपलं गुजरान करत होता.

निठारी हत्याकांड प्रकरण काय होतं?

निठारी हत्याकांडाचा खुलासा २९ डिसेंबर २०२५ रोजी झाला होता. नोयडामधील निठारी भागात एक व्यावसायिक मोनिंदर सिंग पंढेर याच्या घरामागच्या नाल्यामध्ये ८ लहान मुलांचे सापळे आढळून आले होते. कोळीला निठारी गावात १५ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी २०११ मध्ये हायकोर्टानं त्याची शिक्षा कायम ठेवली होती.

त्यानंतर सुरेंद्र कोळीनं २०१४ मध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली होती. पण जानेवारी २०१५ मध्ये इलाहाबाद हायकोर्टानं त्याची दया याचिकेवर निर्णय देताना यावर निर्णय द्यायला खूपच उशीर झाल्याचं सांगत त्याची फाशीची शिक्षा आजन्म कारावासात रुपांतरीत केली होती. इलाहाबाद हायकोर्टानं ऑक्टोबर २०२३ मध्ये कोली आणि त्याचा सहकारी प्रमुख आरोपी पंढेर याला निठारीशी संबंधित इतर प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती. तसंच २०१७ मध्ये देण्यात आलेली कनिष्ठ न्यायालयाची मृत्यूदंडाची शिक्षा पलटवली होती.

सुप्रीम कोर्टानं केली मुक्तता

दरम्यान, सुप्रीम कोर्टानं १२ प्रकरणांमध्ये पंढेर आणि सुंरेंद्र कोली यांना मुक्त केलं होतं. सीबीआय आणि पीडित कुटुंबांनी कोर्टाच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. पण कोर्टानं ३० जुलै २०२५ रोजी सर्व १४ अपील फेटाळून लेवले होते.

तर साधलं मौन

इलाहाबाद हायकोर्टांनं मनिंदर पंढेरला २००६ च्या निठारी प्रकरणात निर्दोष सोडलं. तुरुंगातून सुटल्यानंतर ६५ वर्षीय पंढेरच्या कारमध्ये बसला आणि कोणाशीही न बोलता तो निघून गेला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला घेरलं होतं. माध्यमांनी प्रश्न विचारले. पण त्यानं कोणालाही उत्तर दिलं नाही. तसंच गुपचूप थेट गाडीत जाऊन भेटला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT