Saayoni Ghosh: "तू इधर उधर की बात ना कर..."; TMCचं नाव अन् चिन्ह गोठवल्यानंतर सयोनी घोष यांची बोलकी प्रतिक्रिया

Saayoni Ghosh News: निवडणूक आयोगानं नुकतंच तृणमूल काँग्रेसचं पक्ष आणि चिन्ह गोठवलं आहे. यापार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींच्या आधीच्या खंद्या समर्थक पण आता बंड केलेल्या खासदार सयोनी घोष यांनी प्रसिद्ध शायर शहाब जाफरी यांचा शेर शेअर केला आहे.
Saayoni Ghosh news
Saayoni Ghosh news Sarkarnama
Published on
Updated on

Saayoni Ghosh News: पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेसच्या पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत महत्वाचा निर्णय घेतला. पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या मालकीवरुन दोन गटात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ते वापराला आयोगानं अंतरिम स्थगिती दिली आहे. अर्थात तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्हीही गोठवलं आहे. दरम्यान, टीएमसीच्या बंडखोर खासदार सयोनी घोष यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदार सयोनी घोष यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रसिद्ध शायर शहाब जाफरी यांचा एक शेर शेअर केला आहे. यात त्यांनी म्हटलं की, "तू इधर उधर की न बात कर, ये बता की काफिला क्यूं लुटा..." पण यामध्ये त्यांनी कुठल्याही पक्षावर किंवा राजकीय नेत्याचं नाव घेतलेलं नाही.

Saayoni Ghosh news
Shiv Sena Bow Arrow Symbol : धनुष्यबाण गोठणार? सुप्रीम कोर्टाच्या सवालानंतर बच्चू कडू म्हणाले, ‘काहीही होणार नाही’

राहुल गांधींची निवडणूक आयोगावर टीका

लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी बंगालमधील आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत टीएमसीला पक्षाचं नाव आणि चिन्हाचा उपयोग करण्यापासून रोखल्याबद्दल निवडणूक आयोगावर कठोर टीका केली. राहुल गांधी यांनी म्हटलं की, आधी शिवसेना, त्यानंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस. प्रत्येकवेळी एकच पॅटर्न भाजप आणि निवडणूक आयोग मिळून एखादा पक्ष तोडतात. त्यानंतर त्यांचं निवडणूक चिन्ह हिसकावून घेतलं जातं. त्यामुळं जर अख्खा पक्षच चोरी केला जाऊ शकतो तर करोडो भरतीयांची मतचोरी होणं ही काही आश्चर्याची बाब नाही.

'मत चोरी', 'सरकार चोरी' आणि आता 'पक्ष चोरी' हे आपल्या लोकशाहीच्या पतनाचे प्रतिक बनले आहेत. निवडणूक आयोगाची संविधानिक जबाबदारी जनादेशाचं रक्षण करणं हे आहे. पण उलट ते या ताकदींची मदत करत आहेत. जे जनतेचा निर्णयच बदलून टाकत आहेत. ही लढाई केवळ ममता बॅनर्जी यांची नाही. ही प्रत्येक राजकीय पक्ष, प्रत्येक मतदाराची लढाई आहे. जे स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक लढवू इच्छित आहेत.

Saayoni Ghosh news
Shikhar Pahariya : सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाकडून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा; चक्क भाजप कार्यालयाबाहेर उभारले बॅनर

निवडणूक आयोगाचा अंतरिम आदेश

निवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेसचं नाव आणि चिन्ह याच्या अधिकाराशी संबंधित दोन्ही गटांमध्ये सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा अंतरिम आदेश दिला. आयोगानं म्हटलं की, हे प्रकरण वर्तमानात कलम १५ नुसार विचाराधीन आहे. अंतिम निर्णय होईपर्यंत दोन्ही गटांना पोटनिवडणूक वेगवेगळ्या नावानं आणि निवडणूक चिन्ह घेऊन लढावाव्या लागणार आहेत.

आयोगानं हा निर्णय देताना म्हटलं की, पोटनिवडणुकीपूर्वी हा मुख्य वाद पूर्णतः सोडवण्यासाठी पुरेसा वेळ नाही. या आदेशाला कोणत्याही प्रकारच्या अंतिम निर्णय मानला जाऊ शकत नाही. पश्चिम बंगालमध्ये नंदीग्राम आणि रेजिनगर विधानसभा जागांवर पोटनिवडणूक ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोागानं तृणमूल काँग्रेसचं नाव आणि चिन्ह गोठवलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com