West Bengal politics : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह तृणमूल काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. भाजपने पहिल्यांदाच राज्यात ऐतिहासिक विजय मिळवत सत्ता काबीज केली. भाजपच्या विजयासह मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी ममतादीदींच्या केलेल्या पराभवाची बरीच चर्चा झाली. अधिकारी यांनी सलग दुसऱ्या निवडणुकीत त्यांचा पराभव केला आहे.
ममता बॅनर्जी यांना आपल्या पारंपरिक भवानीपूर मतदारसंघात पराभव झाल्याने मोठा धक्का बसला. आता निवडणूक आयोगाकडील मतदानाची बुथनिहाय आकडेवारी समोर आली आहे. ममतांचे घर असलेल्या वॉर्डमध्येही सुवेंदू अधिकारी ममतांपेक्षा सरस ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. सुवेंदू यांनी मागील विधानसभा निवडणुकीत ममतांचा नंदीग्राम मतदारसंघात पराभव केला होता.
काय घडलं भवानीपूरमध्ये?
भवानीपूर मतदारसंघातील सुवेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी यांच्यातील लढत राज्यातील सर्वाधिक हायहोल्टेज लढत होती. या लढतीत संपूर्ण मतदारसंघातच अधिकारी वरचढ ठरल्याचे बुथनिहाय आकडेवारीत समोर आले आहे. त्यांनी २६७ बुधपैकी २०७ बुथमध्ये ममतांपेक्षा अधिक मते मिळविल आहेत.
ममता बॅनर्जी यांचे घर असलेल्या वॉर्ड क्रमांक ७३ कालीघाट परिसरात अधिकारी यांना तब्बल ८ हजार ९३२ मते मिळाली आहे. तर ममतांना केवळ ४ हजार २८४ मतांवर समाधान मानावे लागले आहे. अधिकारी यांना ममतांपेक्षा दुपटीहून अधिक मते मिळाली आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कार्यकर्ते आणि अधिकारी यांना स्पष्ट संदेश दिला होता, ममतांना त्यांच्या घरातच हरवायचे आहे.
काही बुथवर ममतांना मिळालेली मते धक्कादायक आहे. भवानीपूर मतदारसंघातील बहुतेक बुथवर प्रत्येकी ४०० ते ७०० मतदारसंख्या आहे. अनेक बुथवर ममतांना ५० मतेही मिळाली नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. २०२१ च्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांना मतदारसंघातील सर्व सात वॉर्डमधून लीड मिळाले होते. मात्र, यावेळी त्यांचा सुमारे १५ हजार मतांनी पराभव झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.